High Protein Salad: 
फूड

Sunday Special Recipe: रविवार आरोग्यादायी बनवायचयं? मग सकाळी नाश्त्यात बनवा 'हाय प्रोटीन सॅलड', जाणून घ्या रेसिपी

पुजा बोनकिले

सकाळ साप्ताहिक- सुलभा प्रभुणे

High Protein Salad: रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने काही घाई नसते. यामुळे तुम्ही सकाळी नाश्त्यात पौष्टिक मटकी सॅलड बनवू शकता. मटकी सॅलड बनवणे खुप सोपे आहे. मटकीमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन यासारखे अनेक पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तसेच सकाळी नाश्त्यात खाल्यास दिवसभर ऊर्जा राहते आणि वजन देखील नियंत्रणात राहते. हा पौष्टिक सॅलड अतिशय चवदार असून आरोग्यदायी आहे. तुम्हीसॅलड सकाळी नाश्त्यात किंवा जेवणात खाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया मटकी सॅळल बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत काय आहे.

हाय प्रोटीन सॅलड बनवण्याठी लागणारे साहित्य

एक वाटी मोड आलेली मिक्स कडधान्ये

२ टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे

सोललेल्या संत्राच्या १ वाटी फोडी

अर्धे लिंबू

१ टीस्पून चाट मसाला

२ चमचे मनुका/ बेदाणे

२ टेबलस्पून अक्रोडाचे तुकडे

आले व मिरची ठेचा (अगदी थोडासा)

सजावटीसाठी कोथिंबीर

हाय प्रोटीन सॅलड बनवण्याची कृती

हाय प्रोटीन सॅलड बनवण्यासाठी सर्वात पहिले मोडाची कडधान्ये जरा वाफवून घ्यावीत.

ती एका बाऊलमध्ये घेऊन त्यात अक्रोडाचे तुकडे, शेंगदाणे, मनुका घालव्यात.

चाट मसाला, मीठ, लिंबाचा रस, चवीनुसार आले-मिरचीचा ठेचा घालावा.

सर्व मिश्रण नीट मिक्स करावे.

वरून सोललेल्या संत्राच्या फोडी घालाव्यात.

शेवटी कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: रस्ते अडवून वाळीत टाकलं, मराठ्यांवर प्रचंड अन्याय सुरु; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

PM Modi Pune Visit: सिव्हिल कोर्टवरुन स्वारगेटला किती मिनिटांत पोहचणार? पंतप्रधान करणार अंडरग्राउंड मेट्रोचे उद्घाटन

Navi Mumbai: लॉजमध्ये बसून फेक नोटा छापत होतं जोडपं; कारमध्ये फिरायचे, दररोज ऑनलाईन फूड मागवायचे

Free Fire Max Redeem Codes : फ्री फायर प्रेमींसाठी खुशखबर! आजचे रिडीम कोड्स उपलब्ध,फ्रीमध्ये अनलॉक करा रिवॉर्ड्स

Post Office Schemes : पोस्टाच्या खात्यावर आता मोठ्या रकमेचे व्यवहार,पोस्ट-आयपीपीबीचे खाते करा लिंक

SCROLL FOR NEXT