Bread Pakoda Chat esakal
फूड

Tasty Bread Pakoda Chat : झटपट बनवा चटपटीत ब्रेड पकोडा चाट

आज तुम्हाला झटपट बनणारी चटपटीत ब्रेड पकोडा चाट बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

How To Make Bread Pakora Chaat : ब्रेड पकोडा एक अत्यंत प्रसिध्द असं स्ट्रीट फूड आहे. स्नॅक्स म्हणून याला खूप पसंत केलं जातं. बटाटा ब्रेड पकोडा सगळीकडे सहज उपलब्ध होतो. पण तुम्ही कधी चीज ब्रेड पकोडा चाट बनवला आहे का? जाणून घ्या रेसिपी.

साहित्य

  • ६ ब्रेड स्लाइस

  • २ वाट्या बेसन

  • अर्धा टी स्पून गरम मसाला

  • २ चिमूट हिंग

  • २ चिरलेल्या मिरच्या

  • चिरलेली कोथिंबीर

  • अर्धा टी स्पून ओवा

  • पाव चमचा हळद

  • तेल

  • मिठ

चाटसाठी साहित्य

  • १ कांदा

  • अर्धा टी स्पून लाल मिरची पूड

  • काळं मिठ

  • अर्धा टी स्पून भाजलेलं जीरं

  • अर्धा टी स्पून चाट मसाला

  • १ टी स्पून चाट मसाला

  • १ टेबल स्पून चिंचेची चटनी

  • १ टोमॅटो

  • पाव कप बुंदी

  • पाव कप दही

  • १ टेबल स्पून टोमॅटो सॉस

  • चिरलेली कोथिंबीर

  • पाव कप भूजिया

  • मीठ

कृती

  • एक कढई घ्यावी. त्यात बेसन, ओवा, लाल मिरची पूड, हळद, गरम मसाला, चिरलेली हिरवी मिरची घ्या.

  • यात सर्व मसाले आणि चवीनुसार मीठ टाका.

  • गरजेनुसार पाणी घालून बॅटर बनवा

  • त्यात त्रिकोणी कापलेले ब्रेड स्लाइस घाला.

  • गरम तेलात तळून घ्या.

  • टोमॅटो कांदा बारीक चिरून घ्या.

  • तळलेल्या ब्रेड पकोड्याला मधून कापून त्यात लाल मिरची पूड, जीरे पूड, काळं मीठ, सादं मीठ, चिरलेला कांदा, टोमॅटो घाला. त्यावरून कोथिंबिर, चिंचेची चटनी, दही घाला. वरून भूजिया शेव घालून सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT