Paneer And Corn Papad Roll Recipe: पावसाळ्यात चहासोबत काही तरी चटपटीत स्नॅक्स खाण्याची इच्छा होते. रोज संध्याकाळी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न असेल तर तुम्ही पनीर अँड कॉर्न पापड रोल बनवू शकता. पनीर आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच पापड तळून घेता भाजून घेतल्यास वजन वाढण्याचे टेंशन राहणार नाही. पनीर अँड कॉर्न पापड रोल बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि ते बनवावे कसे हे जाणून घेऊया.
चणा डाळ
उकळलेले कार्न
पनीरचे तुकडे
बारिक चिरलेला कांदा
बारिक चिरलेला टोमॅटो
शिमला मिरची
चीज
तेल
मीठ
सर्वात आधी पॅनमध्ये तेल गरम करावे.
त्यात पनीर, शिमला मिरची, बारिक चिरलेला कांदा, बारिक चिरलेला टोमॅटो, चणा डाळ, उकळलेले कार्न चांगले मिक्स करावे.
नंतर त्यात लाल तिखट, हळद, मीठ टाकून चांगले शिजू द्यावे.
नंतर त्यावर चीज टाकावे.
नंतर हे सारण पापडमध्ये टाकून गरम त्वायवर भाजून घ्यावे आणि रोल तयार करावा.
कुरकुरीत पनीर अँड कॉर्न पापड रोल तयार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.