Street Foods In Ayodhya : अयोध्येमध्ये मागील काही दिवसांपासून प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापणेची जय्यत तयारी सुरू आहे. अयोध्येमध्ये २२ जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची नवीन मंदिरात प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. त्यामुळे, सध्या अयोध्येमध्ये एक वेगळाच उत्साह पहायला मिळत आहे.
या राम मंदिराच्या प्रतिष्ठापणा सोहळ्याला राजकारणापासून ते क्रीडा, मनोरंजन आणि अध्यात्मातील अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत. या व्यतिरिक्त ५५ देशांमधील सुमारे १०० विशेष लोकांनाही या सोहळ्याची खास आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.
अयोध्या नगरी ही केवळ राम मंदिरासाठी प्रसिद्ध नाही तर येथील खाद्यपदार्थांसाठी देखील प्रसिद्ध आहे. एकदा जर तुम्ही येथील खाद्यपदार्थांची चव चाखली तर ही चव तुम्ही कधीच विसरणार नाही. मग, ते चाट असो किंवा जिलेबी.
अयोध्येत आल्यानंतर, येथील खास मसाल्यांनी बनवलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याशिवाय अयोध्येचा प्रवास हा पूर्ण मानला जात नाही. त्यामुळे, आज आपण अयोध्येतील खास स्ट्रीट फूड्सबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुम्ही अयोध्येला जाण्याचा विचार करत असाल तर तिथे गेल्यावर हे स्ट्रीट फूड्स खायला विसरू नका.
दाल कचोरी आणि पूरी हा अयोध्येतील लोकांचा सकाळचा आवडता नाश्ता आहे. या दाल कचोरीमध्ये विविध प्रकारच्या भाज्या आणि कडधान्यांचा समावेश असतो. अयोध्येमध्ये मूग आणि उडीद डाळ यांच्यापासून बनवलेली कचोरी खूप प्रसिद्ध आहे. ही कचोरी चटणी किंवा भाजीसोबत खाल्ली जाते. या कचोरीची चव अतिशय अप्रतिम लागते.
ही स्पेशल कचोरी खाल्ल्यानंतर पोट लवकर भरते. मात्र, तुमचे मन लवकर भरत नाही. त्यामुळे, अयोध्येत गेल्यावर या खास दाल कचोरीचा आस्वाद घ्यायला विसरू नका.
उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये चाट विशेष लोकप्रिय आहे. या राज्यातील विविध शहरांमध्ये चाटचे विविध प्रकार पहायला आणि चाखायला मिळतात. अयोध्येतील चाटची देखील खासियत आहे. ही खासियत म्हणजे अयोध्येमध्ये मिळणाऱ्या चाटसोबत गोड-आंबट चटणी, मसालेदार चणे, कोथिंबीर आणि इतर मसाल्यांचा वापर केला जातो. यामुळे, चाटची चव देखील वाढते.
हे खास प्रकारचे चाट खाण्यासाठी संध्याकाळच्या वेळी स्टॉल्सवर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होते. हिवाळ्यात हे खास प्रकारचे चाट खाण्याची मजा काही औरच असते. तुम्ही अयोध्येत गेल्यानंतर येथील चाटचा आस्वाद नक्की घ्या.
ज्या लोकांना गोड खायला आवडते. त्यांच्यासाठी अयोध्येमध्ये गोड पदार्थांचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. साखरेच्या पाकात बुडवलेली जिलेबी असो किंवा तोंडात विरघळणारे मऊ लाडू असो. येथे तुम्हाला मिठाईंचे भन्नाट ऑप्शन्स मिळतील.
लाडू, जिलेबी आणि विविध प्रकारच्या मिठाईंसोबत येथील स्पेशल रबडी खायला विसरू नका. अयोध्येतील स्पेशल रबडी सुप्रसिद्ध असून या रबडीमध्ये विविध प्रकारच्या ड्रायफ्रूट्सचा आणि केशरचा वापर केला जातो. त्यामुळे, या रबडीची चव खास असते. अयोध्येत गेल्यावर ही रबडी चाखायला विसरू नका.
अयोध्येत गेल्यावर येथील दही भल्ले खायला अजिबात विसरू नका. या दही भल्ल्यांची चव इतकी अप्रतिम आहे की, तुम्ही या दही भल्ल्यांची चव विसरूच शकणार नाही. हे दही भल्ले डाळींपासून बनवले जातात.
यासाठी विविध प्रकारच्या डाळींचा वापर केला जातो. या वड्यांमध्ये दह्याचा वापर करून ते गोड-आंबट चटणीसोबत खाल्ले जातात. अशा प्रकारचे चविष्ट दहीभल्ले तुम्हाला अयोध्येतील प्रत्येक गल्लीमध्ये चाखायला मिळतील.
विशेष म्हणजे अयोध्येतील या स्ट्रीट फूड्स आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजण्याची गरज पडणार नाही. कमी पैशांमध्ये तुम्ही येथील स्ट्रीट फूड्सचा आस्वाद घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.