These things spoil quickly in the fridge Do not use for more than a day 
फूड

फ्रिजमध्ये लवकर खराब होतात या गोष्टी: एक दिवसापेक्षा जास्त वापरू नका

धनाजी सुर्वे

कोल्हापूर :  फ्रिज एक आपल्यासाठी अशी गोष्ट आहे की त्यामध्ये शिल्लक राहिलेले काही पण ठेवा आणि दोन तीन दिवसांनी त्याचा वापर करा. फ्रिजमध्ये भाज्या जास्त दिवस शिल्लक राहतात. शिवाय मन करेल तेव्हा थंड थंड कोल्ड्रींगही मिळते. काही पण शिल्लक राहिले की ते फ्रिजमध्ये ठेवले तर चालते असा बऱ्यापैकी भारतीय लोकांचा समज आहे. परंतु, काही गोष्टी फ्रिजमध्ये एका दिवसापेक्षा जास्त काळ राहत नाहीत. 

टरबूज, खरबूज, मेलन्स

काही लोकांना सवय असते की फ्रिजमध्ये पूर्ण टरबूज ठेवायचे. परंतु, यामुळे अनेक धोके उद्भउ शकतात.  फ्रिजमध्ये मेलन्स स्टोअर करून ठेवले तर त्याचा स्वाद बदलतो. जास्त थंड हवामानामध्ये मिळणारे आरोग्यदायी घटक नष्ट होतात.  जर तुम्ही मेलन्सला कापून फ्रिजमध्ये ठेवले तर ते जास्त धोकादायक ठरते. एक दिवसापेक्षा जास्त दिवस कापलेली फळे फ्रिजमध्ये ठेवली तर ते अॅसिडिक बनते. 

स्टोअर करण्याची योग्य पद्धत

फळांना पाण्यामध्ये टाकून ठेवा किंवा शिल्लक राहिलेले असेल तर फक्त एक दिवसासाठी हवेशीर डब्यात ठेवून ते फ्रिजमध्ये ठेवा. 

कच्चे आळू

कच्चे आळू फ्रिजमध्ये ठेवणे धोकादायक आहे.  कारण ठंड हवामानात त्याची चव बदलली जाते आणि आळू आंबट होऊ लागते.  जर चिरलेले आळू फ्रिजमध्ये ठेवले तर ते ऑक्सिडाइज होते आणि त्याचा रंग बदलतो.  फ्रिजमध्ये ठेवण्याची योग्य पद्धत कच्चे आळू एखाद्या हवा जाईल अशा बास्केटमध्ये ठेवा. जेथे थेट ऊन पोहोचणार नाही.  

मध

मधात साखरेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ते फ्रिजमध्ये ठेवण्याची जास्त आवश्यकता नसते. तरीह तुम्ही मध फ्रिजमध्ये ठेवला तर त्याची चव बदलण्याचा धोका असतो.  
शिवाय मध फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर तो कडक होतो.

काय आहे योग्य पद्धत

मधाला कोलीतील वातावरणातच ठेवा. जर चुकून मध फ्रिजमध्ये ठेवलाच तर तो कोमट पाण्यात थोडावेळ ठेवा. 

कॅन मधील अन्न

रसगुल्ला, बेरी, ऑलिव्ह,दुधाळ असा पदार्थ कॅनमध्ये येतात. शिल्लक राहिलेले हे पदार्थ फ्रिजमध्ये ठेवले तर ते मेटल रिएक्ट होतात. कॅनमधून बाहेर काढल्यानंतर या पदार्थांची चव राहत नाही.  

योग्य पद्धत

जर हे अन्न शिल्लक राहिले तर ते हवेशील डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवा 
 
कच्चे केळ

जर तुम्ही कच्चे केळ फ्रिजमध्ये ठेवले तर ते काळे पडेल किंवा त्याची पिकण्याची प्रक्रिया बंद होईल. 
 
योग्य पद्धत

केळांना एकाद्या हवेशील बास्केटमध्ये ठेवून सुर्याची किरणे थेड पडणारा नाहीत अशा ठिकाणी ठेवा. याशिवाय कच्चे आंबे, पेरू, टोमॅटोसारखी फळे खोलीच्या वातावरणातच पिकलेली चांगहे राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT