वजन कमी करण्यासाठी लोक अनेकदा आहारात अशा पदार्थांचा समावेश करतात, जे खाल्ल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच, यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते. तुम्ही देखील वजन कमी करण्यासाठी या प्रकारचे सुपर फूड शोधत असाल, तर आपण आहारात मखाणा खाऊ शकता. तुम्ही नाश्त्यामध्ये 'मसाला मखाना' ट्राय करू शकता.
100 ग्रॅम मखाना
4 चमचे ऑलिव्ह ऑइल
1/4 टीस्पून लाल मिरची पावडर
1/4 टीस्पून हळद पावडर
1/4 टीस्पून काळी मिरी
1/2 टीस्पून चाट मसाला
चवीनुसार मीठ
कढईत थोडे ऑलिव्ह ऑइल घालून मंद आचेवर गरम करा. आता त्यात मखाना फ्राय करा. नंतर एका भांड्यात वेगळे काढा.
आता कढईमध्ये ऑलिव्ह ऑइल टाका आणि ते गरम करा. नंतर त्यात सर्व मसाले घाला. मसाले जळणार नाहीत याची काळजी घ्या.
आता तयार केलेल्या मसाल्यामध्ये मखाना टाका आणि चांगले मिसळा. मंद आचेवर काही मिनिटे फ्राय करा. आता तुमची मसाला मखाना रेसिपी तयार आहे.
मखाना तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे देते. त्यामध्ये असलेले उच्च फायबर आतड्यांच्या हालचाली सुधारून तुमची पचनसंस्था राखते. मखानामध्ये प्रथिने देखील भरपूर असतात. त्यामुळे त्यांचा आहारात समावेश करून तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते.