tips to make delicious Paneer Bhurji  
फूड

Food Tips: पनीर भूर्जी स्वादिष्ट बनवण्यासाठी फॉलो करा 'या' खास टिप्स

पनीर भूर्जी बनवताना अनेक चुका होत असतात. त्यामुळ होणाऱ्या चुका टाळण्यासाठी आणि स्वादिष्ट पनीर भूर्जी बनवण्यासाठी काही टिप्स

सकाळ डिजिटल टीम

शाकाहारी लोकांची पहिली पसंती नेहमी पनीरच असते. यापासून अनेक पदार्थ तयार केले जातात. पनीरचा कोणताही पदार्थ असो शाकाहारी खवय्ये चांगलाच ताव मारतात. पनीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दुधापासून बनवलेल्या पनीरमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात.

कोणताही सण असो वा शाकाहारी पाहुण्याचें घरी स्वागत असेल तर पनीरचा बेत ठरलेला असतो. शाही पनीर, मटर पनीर आणि पनीर मसाला यांसारखे अनेक पनीर पदार्थ तयार करतो. पण बदलत्या युगानुसार यामध्ये आणखी व्हरायटी अॅड झाल्या आहेत. लोक रोल, पकोडे किंवा पनीर मोमोज मोठ्या उत्साहाने खाताना दिसतात.

पनीरचे पदार्थ आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे महिलांना माहीत आहे. त्यामुळे आठवड्यातून दोनदा का होईना पनीरचे पदार्थ घरी बनतातच. कधी शाही पनीर तर कधी पनीर भूर्जी तयार केली जाते. पण पनीर भूर्जी बनवताना अनेक चुका होत असतात. त्यामुळ होणाऱ्या चुका टाळण्यासाठी आणि स्वादिष्ट पनीर भूर्जी बनवण्यासाठी काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ताज्या पनीरचा करा वापर

पनीर भूर्जी चविष्ट बनवण्यासाठी पनीर ताजं आणि चवीला चांगली असणे महत्त्वाचे आहे. कधीकधी साठवलेल्या पनीरची चव आंबट होते. अशा स्थितीत पनीरच्या टेक्सचरकडे लक्ष देणं गरजेचं आहे, पण जर तुम्ही त्याकडे लक्ष दिलं नाही तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

काही महिला घरीच पनीर बनवण्याला पसंती देतात. त्यासाठी लिंबाचा रस, व्हिनेगर किंवा दही यासारख्या ऍसिडचा वापर करतात. पण याचे प्रमाण मर्यादीत असणं गरजेचं आहे.

बारीक चिरलेल्या भाज्या वापरा

भूर्जी बनवताना पनीर खिसाव लागतं. त्यामुळं यामध्ये भाज्या चिरताना त्यांच्या आकाराकडे लक्ष देणं गरजेचं असतं. भूर्जीसाठी भाजी खूप बारीक चिरलेली लागते. असं केल्यानं पनीर आणि घातलेल्या भाज्या वेगवेगळ्या दिसणार नाहीत.

तेलाचं प्रमाण लक्षात घ्या

पनीर जास्त असतं म्हणून अनेकदा महिला तेल जास्त वापरण्याकडे अधिक कलतात. पण भूर्जी करताना लक्षात घ्या की, खिसलेलं पनीर शिजल्यानंतर खुपच कमी दिसतं आणि तेल जास्त दिसतं. त्यामुंळं तेलाचा वापर करताना अंदाज घेण महत्त्वाच ठरतं.

दह्याचा वापर करा

ग्रेव्हीमध्ये दही किंवा मलई वापरली जाते असे अनेकांना वाटते. पण तसं नाही, जेवणाची चव वाढवण्यासाठीदेखील तुम्ही दही वापरू शकता. भुर्जीची चव वाढवण्यासाठी दही वापरा.

कसुरी मेथी

कसुरी मेथी वापरा, ज्यामुळे केवळ चवच नाही तर सुगंध देखील वाढेल. कसुरी मेथी दोन प्रकारे घालता येते, भाजी तयार करताना आणि दुसरी सर्व्ह करताना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT