Vada Pav Pops Recipe esakal
फूड

Vada Pav Pops Recipe : आहाहा...! वडापाव पॉप्सची चवच न्यारी, रेसिपी बघा आणि आत्ताच ट्राय करा

वडापावची टेस्ट आणि मायोनिजसोबत, काहीतरी वेगळं नक्की खा

Pooja Karande-Kadam

Vada Pav Pops Recipe : वडापाव हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध पदार्थांपैकी एक आहे. मात्र, आता वडापाव देशाच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात मिळतो. स्ट्रीट फूड खाण्याची आवड असणारे लोक अनेकदा वडापावची चव चाखतात. पण तुम्ही कधी वडापाव पॉप्सची टेस्ट केले आहे का?. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सोप्या व्हिडिओ रेसिपी पाहून वडापाव पॉप्सची अप्रतिम चव ट्राय करू शकता.

वडापाव एकदम चवदार आणि तो बनवायला ही फारसा वेळ लागत नाही.त्यामुळे ब्रेकफास्टसाठी इन्स्टंट स्नॅक्स बनवायचा असेल तर. त्यामुळे वडापाव पॉप्स ट्राय करणे हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया वडापाव पॉप्स बनवण्याची रेसिपी. वडापाव पॉप्सची ही रेसिपी इन्स्टाग्राम युजरने (@agarnishbowl) आपल्या अकाऊंटवर शेअर केली आहे.(Food)

साहित्य ४ वाट्या ब्रेड, २ चीज स्लाइस, ३ उकडलेले बटाटे, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/४ चमचा हळद, १ चिमूट हिंग, १/४ चमचा मोहरी, १/२ इंच बारीक चिरलेले आले, १/२ कप बेसन, २ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, १ चिमूट बेकिंग सोडा, डीप फ्राय करण्यासाठी तेल, ३-४ कढीपत्ता, १ चमचा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घ्या. चला तर मग जाणून घेऊया वडापाव पॉप्स कसे बनवायचे.

वडापाव पॉप्स बनवण्यासाठी

आधी बटाटे सोलून मॅश करा. आता हिरवी मिरची, आलं आणि लसूण बारीक करून घ्या. त्यानंतर कढईत २ चमचे तेल गरम करावे.

आता त्यात मोहरी घालून परतून घ्या. मोहरी फोडल्यानंतर कढईत हिंग, कढीपत्ता, हळद आणि आले लसूण पेस्ट घाला. गॅसवर १ मिनिट शिजवून घ्या.

नंतर हे मिश्रण बटाट्यात घालून मिक्स करा. नंतर बटाट्यात हिरवी कोथिंबीर, लिंबाचा रस आणि मीठ घाला. त्यानंतर एका बाऊलमध्ये बेसन घ्यावे. आता त्यात मीठ, बेकिंग सोडा आणि पाणी घालून मिश्रण तयार करावे. ब्रेडचे स्लाइस सर्व बाजूंनी कापून त्याच्या कडा वेगळ्या करा.

ब्रेडच्या स्लाइसवर हिरवी चटणी लावा. ब्रेडच्या दुसऱ्या तुकड्यावर लाल लसणाची चटणी लावा. आता चीजस्लाइस आणि काठी ठेवून दोन्ही ब्रेड स्लाइस बंद करा.

यानंतर बटाट्याचे मिश्रण ब्रेड स्लाइसभोवती लावून झाकून ठेवावे. आता बेसनाच्या द्रावणात घालून कढईत डीप फ्राय करा.

आता तुमचा वडापाव पॉप्स तयार आहे. त्याला सजवण्यासाठी तुम्ही मेयोनीज, टोमॅटो केचप आणि हिरव्या चटणीपासून डिझाइन बनवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे 46,178 मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT