vicky kaushal esakal
फूड

विकी कौशलला आवडतो रताळ्याचा परोठा!त्याच्या आईने केलेली गंमत वाचा

विकीचा आहार आणि आवड जपण्याचं काम सध्या त्याची आई करते आहे

सकाळ डिजिटल टीम

विकी कौशल कतरिना कैफ (Vicky Kaushal Katrina Kaif ) यांनी लग्नानंतर आपआपल्या कामाला पुन्हा सुरूवात केली आहे. पण विकीचा आहार (Diet) आणि आवड जपण्याचं काम सध्या विकीची आई करते आहे. लेकाला बटाट्याचे परोठे (Aloo Paratha) खावे वाटत होते. पण भूमिकेसाठी फिटनेस जपताना ते परोठे खाणं शक्य नव्हतं. मग त्याच्या आईने युक्ती करून रताळ्याचा परोठा केला आणि तो बटाट्याचा म्हणून विकीला खायला दिला. पण तिने असं का केलं असावं.हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

विकी डाएटसाठी सेलिब्रेटी शेफ अक्षय अरोरा याच्याकडून मार्गदर्शन घेत आहे. त्याप्रमाणे तो ग्लुटेन फ्री डाएट (Gluten Free Diet) करतो. या डाएटमध्ये गहू, गव्हाचे पदार्थ आणि ग्लूटेन असलेले इतर पदार्थ खाणं टाळलं जातं. तसेच बटाटाही खाल्ला जात नाही, पण आपल्या मुलाला बटाट्याचा परोठा आवडतो. मग काय करावं या विचाराने वीणा कौशल यांनी ग्लुटेन फ्री आलू पराठा तयार करताना ग्लुटेन फ्री पीठ, ग्लुटेन फ्री बटाट्यासाठी बटाट्याला पर्याय म्हणून रताळी वापरली. त्यात आलं, गरम मसाला, चाट मसाला, तिखट, जिरे, कोथिंबीर वापरुन त्यांनी हा ग्लुटेन फ्री पराठा तयार केला. तो पराठा वेगन दह्यासोबत विकीने खाल्ला. मुलाचा डाएट नियम न मोडता आरोग्यदायी पर्याय शोधून त्याला त्याच चवीचा पराठ खाऊ घातल्याने विकी कौशलच्या आईचं कौतुक होतंय. ज्यांना बटाट्याचा पराठा खायचा नाही त्यांच्यासाठी रताळी घालून केलेला पराठा हा उत्तम पर्याय आहे. असे अनेक पर्याय सामान्य घरातील मुलांच्या आयाही मुलांसाठी शोधत असतात. त्यामुळे सेलिब्रिटीटीची आई असली तरी आई ही आईच असते.

Gluten Free paratha

कसा कराल परोठा (Recipe)

साहित्य- ग्लुटेन फ्री कणीक, रताळी, हिरवी मिरची किंवा लाल तिखट, हळद, हिंग, किसलेलं आलं, मीठ, कोथिंबीर, चाट मसाला, गरम मसाला आणि तेल

कृती- ग्लुटेन फ्री गव्हाचं पीठ मऊसर मळून घ्यावं. ते १५ ते २० मिनिटं सेट होवू द्यावी. एकीकडे रताळी कुकरमध्ये शिजवावीत. शिजून गार झालेली रताळी सोलून कुस्करुन घ्यावी. कढईत थोडं तेल थोडं तापलं की त्यात किसलेलं आलं, सर्व मसाले टाकून ते मंद आचेवर परतावेत. मग त्यात कुस्करलेले रताळे घालून परतून घ्यावं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. सारण गार होवू द्यावं. ग्लुटने फ्री गव्हाच्या कणकेची थोडी पोळी लाटावी. त्यात बटाट्याचे सारण जसे भरतो तसे हे रताळ्याचे सारण भरावे. पुन्हा गोळा बंद करून लाटावे. गरम तव्यावर दोन्ही बाजून चांगला भाजावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT