औरंगाबाद : संध्याकाळचा वेळ काही लोकांचा चहावरच धकून जातो. मात्र काहींना याबरोबरच तिखट किंवा चमचमीत खायची इच्छा होते. तर जाणून घेऊया अशाच खूप चविष्ट असा स्नॅक्स बनवण्याविषयी..
साहित्य -
- पास्ता - एक कप (उकडलेला आणि कापलेला), प्रोसेस्ड - १/२ कप (बारीक केलेले), लोणी - दोन टेबल स्पून, मैदा- ५ टेबलस्पून, दूध - दीड कप, कोथिंबीर-२ टेबलस्पून (बारीक केलेला), मीठ - चवीनुसार, हिरवी मिरची - २ टीस्पून ( बारीक केलेली), ब्रेड क्रंब्स - १/२ कप, तेल - तळण्यासाठी
बेटर बनवण्यासाठी
मैदा - १/२ कप, पाणी -३ /४ कप
कृती
- एका नाॅनस्टिक पॅनमध्ये लोणी गरम करा आणि त्यात मैदा टाकून मध्यम आंचवर एक ते दोन मिनिटांपर्यंत भाजून घ्या
- आता त्यात दूध टाकून चमच्याने सहा ते सात मिनिटांपर्यंत हलवा
- आता मिश्रण थंड होण्यासाठी वेगळ ठेवून द्या. जेव्हा मिश्रण थंड होऊल, तेव्हा त्यात पास्ता, चीज, धने, हिरवी मिरची आणि मीठ टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करुन घ्या.
- आता मिश्रणापासून छोटे आणि गोल बाॅल्स बनवून घ्या
- आता एका वाटीत मैदा आणि पाणी टाकून मिक्स करुन घट्ट बेटर बनवून घ्या. पुन्हा बाॅल्सला मैद्याच्या बेटरमध्ये बुडवा आणि पुन्हा त्यांना चारीही बाजूने ब्रेड क्रंब्सने कोट करा.
- आता कडईत तेल गरम करा आणि मध्यम आंचवर बाॅल्स गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या
- आता ते एका प्लेटवर काढून घ्या. ती आता कॅचअप किंवा चिली साॅसबरोबर खायला तयार
Edited By- Archana Banage
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.