weak bones include these 7 best food in your diet food health marathi news 
फूड

Bone Building Foods: कमकुवत हाडांच्या समस्येमुळे आपण त्रस्त असाल तर 'या' 7 उत्तम पदार्थांना आहारात समावेश करा

अर्चना बनगे

कोल्हापूर : बदलत्या जमान्यात प्रत्येकाचे जीवनमान धावपळीचे बनले आहे.  धावपळीच्या जीवनात आपल्या खाण्याच्या सवयी सुद्धा बदलल्या आहेत. आणि याच कारणामुळे आपल्या शरीरातील हाडे अशक्त बनू लागली आहेत. हाडे अशक्त बनली तर आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हाडांच्या मजबुतीसाठी  कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. 

हे लक्षात ठेवा 

*हिरव्या पालेभाज्या मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि पोषणयुक्त जीवनसत्वे असतात.
 
*सोयाबीन मध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम याचे चांगले प्रमाण असते.

* बदाम हे आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

एका विशिष्ट वयानंतर हाडे कमजोर होऊ लागतात. अशावेळी ही हाडे मजबूत ठेवण्यासाठी शरीरामध्ये हाडांसाठी उपयुक्त प्रथिने असणे आवश्यक आहे. प्रोटीन ,कॅल्शियम, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम फॉस्फरस हे सर्व आपले हाडे मजबूत करण्यासाठी मदत करतात. यामधील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे पूर्ण स्वरूपात आपल्या शरीरामध्ये आवश्यक असते. विटामिन डी हे सकाळच्या कोवळ्या उन्हात  सुद्धा मिळू शकते. आपल्याला फीट राहण्यासाठी हाडे मजबूत असणे आवश्यक असते.

आपली हाडे जेवढी लवचिक असतील तेवढे आपण जादा चालू फिरू शकतो. हाडे कमजोर झाली तर आपल्या शरीरामध्ये विविध दुखणे, हातपाय आखडणे असे प्रकार होऊ लागतात. कधीकधी ही समस्या इतकी वाढते की आपल्याला उठून बसणे सुद्धा मुश्किल होते. हाडे मजबूत राहण्यासाठी आपले जेवणही  पौष्टिक असणे आवश्यक आहे. आपल्या आहारामध्ये प्रोटीनयुक्त भरपूर असणारी फळे खाणे आवश्यक आहे. जी हाडांना मजबूत बनण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. आपण या ठिकाणी अशा आहाराचा आहाराबाबत माहिती घेणार आहोत जी तुमचे हाडे मजबूत करतील. 

1 )मासे 

हाडे मजबूत करण्यासाठी  तुम्ही तुमच्या आहारात मासे समाविष्ट करावे. सोलमन, टूना, सार्दिन हे  मासे अत्यंत फायदेशीर मानले जातात. याच्या सेवनामुळे आपली हाडे अत्यंत मजबूत बनतात.

2) हिरव्या पालेभाज्या
 
हिरव्या पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि पोषक तत्वे असतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. हाडे मजबूत होण्यासाठी यातील न्यूट्रिशन अत्यंत फायदेशीर होतात. यासाठी आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा दररोज समावेश करावा.

3) बदाम
 
बदाम हे शरीराच्या तंदुरुस्तीसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. बदाम मध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे भरपूर प्रमाणात असतात. हे दोन्ही घटक आपल्या हाडांना मजबूत करतात. त्यामुळे बदामचे सेवन आपल्यास उपयुक्त ठरते.

4) दुग्धजन्य पदार्थ 
 
दूध-दही यासारख्या  दुग्धजन्य पदार्थात कॅल्शियम आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात समाविष्ट असतात. जे आपल्या हाडांना अधिक मजबूत बनवतात. दुध   शरीराला अत्यंत फायदेशीर ठरते .यामुळे फक्त केवळ हाडालाच नव्हे तर संपूर्ण शरीराला अत्यंत स्वास्थ्य मिळत असते.

5) सोयाबीन
 सोयाबीन मध्ये असलेले अनेक पोषक तत्वे आपल्या शरीरासाठी साठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. सोयाबीन मध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम याचे चांगले प्रमाण असते. आपली हाडे मजबूत ठेवण्यासाठी आपल्या आहारात सोयाबीनचा समाविष्ट करावा.
 
6)संत्री

संत्री हे विटामिन सी साठी अत्यंत चांगले आहे.  संत्री मध्ये विटामिन सी बरोबरच कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी याचेही प्रमाण चांगले असते. आपली हाडे मजबूत ठेवण्यासाठी आपल्या आहारात संत्री चा समाविष्ट नक्की करा.
 
7)अंजीर 

अंजीर हे असे फळ आहे जे कच्चे आणि सुकलेल्या स्वरूपात तुम्ही खाऊ शकता. अंजीर मध्ये असलेले फायबर्स, पोटॅशियम आणि कॅल्शियम शरीरासाठी उपयुक्त ठरतात. यामुळे सुद्धा आपली हाडे मजबूत बनतात.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT