Travel Food Tips:  Sakal
फूड

Weekend Travel Food Tips: लाँग वींकेडचा आनंद होईल द्विगुणित, फक्त सोबत ठेवा 'हे' पदार्थ, राहाल निरोगी

Travel Food Tips: लाँग वीकेंडला फिरायला जाताना तुम्हाला जास्त दिवस टिकणारे पदार्थ सोबत ठेवायचे असेल तर पुढील पदार्थांचा समावेश करू शकता.

पुजा बोनकिले

Weekend Travel Food Tips: आज स्वातंत्र्यदिनाचा उत्साह संपुर्ण देशात दिसून येत आहे. यंदा १५ ते १९ ऑगस्ट असा लाँग वीकेंड आला आहे. यामुळे अनेकांनी फिरायला जाण्याचे नियोजन केले आहेत. पण प्रवासात बाहेरचे पदार्थ खाऊन आजारी पडायचे नसेल तर घरगुती पदार्थ सोबत ठेवावे. पण कोणते पदार्थ सोबत ठेवावे हा प्रश्न अनेकांना पडतो. प्रवासात अनेक पदार्थ लवकर खराब होतात. यामुळे प्रवासात आरोग्यदायी आणि खराब न होणारे कोणते पदार्थ सोबत ठेवावे हे जाणून घेऊया.

सुकामेवा

लाँग वींकेडला फिरायला जाताना बॅगमध्ये सुकामेवा ठेऊ शकता. हे आरोग्यादायी असते. यामध्ये काजू , बदाम, अकरोट, किशमिश, पिस्ता यांचा समावेश होतो.

कोरडी भाजी

कोरडी भाजी किंवा नमकिन जास्त दिवस टिकतात. यामुळे लाँग वीकेंड ट्रीपला जातांना चीवडा, शेव, घरगुती चिप्स, मुरमुरे यासारखे पदार्थ सोबत ठेऊ शकता.

कणिक बिस्कीट

प्रवासात बाहेरचे पदार्थ खाल्ल्यापेक्षा घरीच बनवलेले पदार्थ घेऊन जाणे आरोग्यदायी ठरते. तुम्ही चहासोबत कणिक बिस्कीट खाऊ शकता. हे घरीच बनवणे सोपे आहे. तसेच हे बिस्कीट आठवडाभर चांगले राहतात.

भडंग

फिरायला गेल्यावर प्रवासात लागलेली छोटीशी भूक भागवण्यासाठी भडंग खाऊ शकता. तुम्ही मुरमुऱ्याचा चिवडाही सोबत ठेऊ शकता. यामुळे जीभेची चव देखील वाढेल.

थेपला

प्रवास करताना थेपले सोबत ठेवणे हा एक उत्तम पर्याय आहे. तसेत थेपले आठवडाभर चांगले राहतात. तुम्ही हवा बंद डब्ब्यात पॅक करून ठेऊ शकता. थेपले चवदार असून आरोग्यदायी देखील आहे.

शेंगदाणा चिक्की आणि लाडू

शेंगदाणा चिक्की आणि लाडू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषक घटक असतात. तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे प्रवासात शेंगदाणा चिक्की आणि लाडू सोबत ठेवावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT