K Pop Diet  
फूड

वजन कमी करण्यासाठी 'K Pop Diet ट्रेंडमध्ये; जाणून घ्या फायदे?

सकाळ डिजिटल टीम

K Pop Diet : फिट आणि स्लिम राहण्याची इच्छा प्रत्येकाला असते पण आजकालच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये खाण्या-पिण्याच्या चूकीच्या सवयींमुळे आणि वर्कआऊन न करण्यामुळे आपल्याला हे शक्य होत नाही. अशा वेळी लोक आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठ खाणे-पिणे बंद करतात, ज्यामुळे शरीरामध्ये अशक्तपणा येतो आणि वेगवेगळे त्रास सुरु होतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोरीयन वेट लॉस डाएट ट्राय करू शकता. कोरीयन वेट लॉस डाएटला के पॉप डाएट देखील म्हणतात. जगभरामध्ये कोरियन ब्युटी टीप्स आणि त्यांचे डाएट प्लॅनला खूप महत्त्व दिले जाते. चला जाणून घेऊ या के पॉप डाएटचे काय आहेत फायदे?

Korean Food

काय आहे के-पॉप डाइट? (What is K-pop diet)

कोरीयन डाएट किंवा के पॉप डाएट सध्या खूप चर्चेमध्ये आहे. या डाएटमुळे तुम्ही खूप सहज वजन कमी करु शकता. कोरीयन के पॉप डाएटमध्ये पारंपरिक कोरीयन पदार्थांचा समावेश केला जातो. के पॉप डाएटमध्ये मील्समध्ये स्नॅक्सचा समावेश नसतो. या डाएटमध्ये फॅटी अॅसीड, शुगर किंवा प्रोसेस्ड फूड यांचा समावेश नाही केला जात. के-पॉप डाएट मध्ये कमी प्रोसेस्ड पदार्थांचा समावेस केला जातो जेणेकरून त्यांचे मुळ गुणधर्म सुरक्षित राहतात. यामध्ये जास्तकरून भाज्यांचा समावेश असतो. शूगर किंवा फॅट्स चे प्रमाण खूप कमी असते. त्यामुले वजन कमी होते आणि चांगली स्कीन देखील मिळते.

Korean vegetable

के-पॉप डाएटमध्ये काय असते?

कोरीयन डाएटमध्ये जास्तकरून भाज्यांचा समावेश असतो पण शुगर किंवा फॅट्सचे प्रमाण कमी असते. डाएट फॉलो करण्याऱ्यांमध्ये लोकांमध्ये कमी कॅलरीवाले पदार्थ जसे फळ, भाज्या, सूप आणि सॅलड यांचा समावेश केला पाहिजे. हे पौष्टिक तर असतातच पण त्यामुळे पोट देखील भरते. त्याशिवाय डाएटमघ्ये लीन मीट(चिकन), अंडे, टोफू, मशरूम आणि शिताके यांचा समावेश करू शकता.

Korean Food Soup
Korean Food vegetable Soup

कोरियन डाएट प्लॅनचे नियम

  • कोरीयन वेट लॉस डाएट प्लॅनमध्ये ठरवलेल्या मर्यादेतच कॅलरी घेण्याचा सल्ला दिला जात नाही. या डाएटमध्ये आपल्या मर्जीनुसार कॅलरी घेता येतात. या डाएट प्लॅनमध्ये व्यंजनासोबत, सूप आणि भाज्यांचा समावेश जास्त समावेस करण्याचा सल्ला दिला जातो.

  • या डाएट प्लॅनमध्ये जास्तीत जास्त योगा आणि एक्सरसाईज करण्याचा सल्ला देतात.

  • हा डाएट प्लॅन फॉलो करण्याऱ्यांना 7-8 तास पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.

Kim-chi

के-पॉप डाएटचे फायदे

  • कोरीयन डाएटमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुले पोट भरते, ज्यामुळे सारखी सारखी भूक लागत नाही. कॅलरीजचे सेवन कमी केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.

  • हलका(लाईट) आहारामुळे जुलाब किंवा पोटदुखीचा त्रास होत नाही. पोटाला आराम मिळेल असा साधा आहार यामध्ये असतो.

  • या डाएटमध्ये प्रोटीन जास्त मिळते ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते. कोरियन डाएट घेतल्यामुळे तुमच्या केसांना योग्य पोषण मिळते ज्यामुळे तुमचे केस लांब आणि जाड होतात.

  • या डाएटमध्ये तुम्ही तळलेले पदार्थ किंवा फास्ट फूड खाऊ शकत नाही ज्यामुळे चेहऱ्यावर होणार्या पुरळच्या समस्येपासून सुटका मिळते.

Korean Soup With Vegetable and Tofu

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT