pineapple Esakal
फूड

Winter Recipe: टेस्टी अन हेल्दी अननसाचा शिरा कसा तयार करायचा?

अननस संधीवात सारख्या आजाराच्या वेदना कमी करते.

सकाळ डिजिटल टीम

Pineapple Almond Sheera: हिवाळा सुरू होताच लोक त्यांच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करतात, ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि शरीर उबदार राहते. अशाच एका टेस्टी मिठाईचे नाव आहे अननसचा शिरा. होय, अननस आणि बदामचा शिरा खायला फक्त टेस्टीच नाही तर तो हेल्दी देखील आहे. 

सुरूवातीला पाहू या अननस खाण्याचे फायदे...

अननसमधील विटामीन सी स्कीन इलास्टिसिटी वाढवते आणि सुंदर बनवते.

अननसमधील ब्रोमेलीन एंजाईम डायझेशन सुधारतात.अननसमधील व्हिटॅमिन सी हिरड्यांना निरोगी ठेवते.

अननस संधीवात सारख्या आजाराच्या वेदना कमी करते.

अननसमधील पोटॅशियम ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचे काम करते.अननसमधील अॅटीऑक्सिंडेन्ट कॅन्सरची शक्यता कमी करते आणि सेल्स हेल्दी ठेवतात.

सर्दी खोकल्याची शक्यता कमी करते, आणि कफ दूर करण्यासाही ते फायदेशीर आहे.

अननसमधील मॅग्निज हाडे आणि कनेक्टिंग टिश्यूज कमी करतात.

अननसाचा ज्यूस, गळ्यातील खरखर कमी करते, सायनसमध्ये त्याचा फायदा होतो.अननसमधील अँटीऑक्सिडन्ट आणि विटामीन सी डोळ्यावर होणार वयाचा परिणाम कमी करतं.

आजच्या लेखात आपण बहुगुणी अननसाचा गोड- आंबट लागणारा शिरा कसा तयार करायचा याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य:

एक खवा

दोन वाटी मॅश केलेले अननस 

साखर

दोन चमचे तूप

केशर चिमूटभर

पिवळा फूड कलर

पिस्ता

बदाम

वेलची पावडर

कृती:

अननस आणि बदामचा शिरा बनवण्यासाठी प्रथम कढई गरम करा, त्यात देशी तूप टाका. अननस मंद आचेवर तुपात शिजू द्या. अननसच्या आतील पाणी सुकेपर्यंत चांगले शिजवा. जेव्हा यात बुडबुडे यायला लागतील तेव्हा पिवळा फूड कलर घाला. आता झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजू द्या. आता दुसरीकडे गरम पाण्यात बदाम दोन ते तिन मिनिटे उकळा आणि बाहेर काढा. नंतर त्याचे साल काढून टाका. बदाम मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर अननसासह पॅनमध्ये मिक्स करा. ही पेस्ट अननसासह मंद आचेवर चांगली भाजावी. दोन्ही एकत्र चांगले मिसळले की त्यात साखर घालावी. साखर वितळल्यानंतर त्यात खवा घालून आणि मंद आचेवर ढवळत राहावे. जेणेकरून हलवा हा तळाला चिकटून जळणार नाही. चांगले शिजल्यानंतर गॅस बंद करा. सर्वात शेवटी वेलची पूड घालून ढवळा. तुमचा टेस्टी अननस बदाम शिरा तयार आहे. सर्व्ह करण्यापूर्वी त्यात बारीक चिरलेले काजू घाला आणि गरमागरम सर्व्ह करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT