Flax Seeds: आपण जर हिवाळ्याच्या दिवसात आपल्या आहारामध्ये जवसाचा समावेश केला तर त्याचे अनेक फायदे आपल्या संपूर्ण शरीराला होऊ शकतात. आणखी एक गोष्ट म्हणजे योग्य प्रमाणात जवसचे तुम्ही जर का नियमीत सेवन केले तर तुमच्या रक्तातील साखर, ट्रायग्लिसराईड्स, हिमोग्लोबिन आणि कोलेस्टेरॉल आटोक्यात राहू शकतात. खास करून स्त्रियांच्या बाबतीत हॉर्मोन्सची पातळी योग्य ठेवण्यासाठी जवसाचा उपयोग होतो.जवस खाल्ल्याने पचन क्रिया किंवा पित्त कमी करण्यासाठी मदत होते. आहारात जवसाचा वापर केल्यास भूक वाढते आणि पचनक्रिया देखील चांगली राहते. म्हणूनच आजच्या लेखात आपण या पौष्टिक अशा जवसची खमंग चटणी कशी करायची याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.
साहित्यः
1) दिड वाटी जवस
2) अर्धा वाटी तिळ
3) कढीपत्ता
4) वाळलेल्या लाल मिरच्या चार ते पाच
5) जिरे
6) मीठ
7) लसूण
8) तेल
कृती
सर्वप्रथम एका लोखंडी कढईत थोडया तेलात लाल मिरच्या लसूण आणि कढीपत्ता तळून घ्यावा व बाजुला काढून ठेवावा.
त्याच तेलात नंतळ जवस परतून हलकीशी परतून घ्यावी.थोडा खमंग सुवास आला की त्यात तीळ घालून मंद आचेवर तीळ आणि जवस भाजून घ्यावे.
भाजलेले जवस आणि तीळ थोडे गार झाले की त्यात मीठ, जिरे व तळलेल्या मिरच्या, लसूण आणि कढीपत्ता घालून मिक्सरमधून फिरवून घेणे किंवा खलबत्त्यात चटणी कुटून घ्यावी.
अशा रितीने खमंग जवसाची चटणी तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही हिवाळ्यात गरम गरम भाकरी किंवा पोळीसोबत खाऊ शकता. सोबतीला ओल्या कांद्याची पात असल्यास अजून मजा येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.