हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणेशाच्या आगमनानंतर घराघरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाडक्या बाप्पाला काही कमी पडायला नको यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. बाप्पाही आपल्या सर्व इच्छा पुर्ण करतो, अशी भक्तांची भावना आहे. बाप्पाच्या आरतीला जाताना तुम्ही बाप्पाला आवडणाऱ्या तीन रंगाचे कपडे परिधान करू शकता. कोणते आहेत ते तीन रंग जे गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहेत, याबद्दल जाणून घेऊयात...
गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर काहीजण सत्यनारायण पूजाही घालतात. तूम्ही या पूजेसाठी आणि आरतीसाठी गुलाबी, आकाशी, फिकट पिवळे आणि क्रीम रंगाचे कपडे घालू शकता. कारण हे रंग बाप्पाला अतिशय प्रिय आहेत.
पांढरा रंगही पवित्रतेचे आणि शांततेचे प्रतिक मानला जातो. तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडेही घालू शकता. पांढऱ्या रंगात तुम्ही स्वत:ला सिंपल आणि सोबर लुक देऊ शकता.
याशिवाय पूजेच्या वेळी तुम्ही लाल रंगाचे कपडे घालू शकता, कारण लाल रंग अतिशय शुभ मानला जातो. लाल रंग गणपती बाप्पालाही प्रिय आहे. तुम्ही या रंगाचे कपडेही परिधान करू शकता.
हिरवा रंग देखील गणपती बाप्पाचा आवडता रंग आहे. हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणून तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे घालू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.