sayyadbhai sakal
ganesh article

गणेशोत्सवातून ऐक्याचा संदेश देणारे सय्यदभाई

सय्यदभाई दरवर्षी गणेशोत्सवाची जणू वाटच पाहत असतात.

कृष्णकांत कोबल

हडपसर : माणूस म्हणून प्रत्येकाच्या जाती धर्माचा आणि सरळ भावनांचा आदर केला पाहिजे; त्यातूनच खऱ्या अर्थाने आपण सामाजिक सलोखा राखू शकतो, असे सांगत गेली पन्नास वर्षाहून अधिक काळापासून गणेशोत्सव व मोहरम सारख्या सणांच्या माध्यमातून हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देण्याचे काम हडपसर येथील सेवादल कार्यकर्ते अब्दुल सय्यद आपल्या कृतीतून करीत आहेत.

एक्काहत्तर वर्षीय सय्यदभाई हे एक छायाचित्रकार, चित्रकार व मूर्तीकारही आहेत. त्यांनी पन्नास वर्षांपूर्वी हडपसर परिसरामध्ये गणपती बनवण्याचा पहिला कारखाना सुरू केला होता. बनवलेल्या मूर्ती सेवाभावी संस्थांना ते मोफत देत. सेवादलाच्या संस्कारामुळे सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांचे प्रयत्न आजही सुरू आहेत. दरवर्षीच्या गणेशोत्सवातून त्यांचे हे काम अधिक स्पष्टपणे जाणवते.

सय्यदभाई दरवर्षी गणेशोत्सवाची जणू वाटच पाहत असतात. अनेक मंडळांना ते राष्ट्रीय एकात्मतेचे देखावे सूचवत. सर्व जाती, धर्म, पंथ यांना एकत्रीत बांधून ठेवणारी संकल्पना ते देखाव्यातून उभी करण्याचा प्रयत्न ते करतात. हडपसरसह पुणे शहरातील विविध मंडळांचे देखावे व सजावटीचे काम ते करीत आले आहेत. मागील पन्नास वर्षापासून ते या कामांमध्ये योगदान देत आहेत. प्रसिद्ध ‌मूर्तिकार डी. एस. खटावकर यांचे ते शिष्य आहेत. त्यामुळे कला क्षेत्रात जपले जाणारे बारकावे त्यांनी जपले आहेत. सय्यदभाईंनी गणपती मंडळांमध्ये केलेली सजावट हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून आजही चर्चिली जाते. त्यांच्या या योगदानासाठी पुणे महानगरपालिकेसह सह विविध मानाच्या गणपती मंडळांनी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.

आई वडील राष्ट्र सेवा दलात असल्याने त्यांच्यावर समाजवादी विचारांचा संस्कार आहेत. हडपसर गावातील युथ क्लब मंडळामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख अशा विविध धर्मांच्या वास्तूशिल्पाचा आधार घेऊन त्यांनी पहिली सजावट केली होती. शहरातील विविध गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना सजावट व देखावा करण्याचे मार्गदर्शन ते करीत राहिले. त्यावेळी अनेक कार्यकर्ते स्वतः रात्रं दिवस अतिशय मन लावून सजावट करीत असत. सय्यदभाईंचे हे कसब व उत्साह पाहून पुणे महानगरपालिकेने त्यांच्या सजावटीचे कौतुक करीत पालिकेच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या गणपती मंडळ सजावट समितीवर परीक्षक म्हणून त्यांची निवड केली होती. महापालिका व दगडूशेठ गणपती मंडळासह मानाच्या गणपती मंडळाने त्यांना पुरस्कार देऊन सम्मानित केले आहे.

त्यांनी गणेशोत्सव दरम्यान बँड पथक ,वाघ्या मुरळी, भारुड, भजन, कीर्तन, लेजीम, झांजपथक, ढोल ताशा या कलाकारांना प्रोत्साहन मिळावे याकरिता महापालिकेच्या माध्यमातून सन्मान करण्याची प्रथा सुरू केली. पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार खटावकर यांच्यासह अरविंद शेंडकर, अनंत वाईकर, केशवराव देशपांडे गुरुजी यांचा सहवास त्याना लाभला. कोरोनाच्या काळात गणपती मंडळावर सजावटीचे निर्बंध आले असले तरी हडपसर भागातील गणपती मंडळाद्वारे विचारातून एकतेच्या सजावटीचे बीजे पेरण्याचे काम ते करत आहेत. त्यांच्या पत्नीसह संपूर्ण कुटुंबावरही हेच संस्कार त्यांनी केले आहेत.

"समाजातील प्रत्येकाने मानवता धर्माचे पालन केले पाहिजे. सेवाभाव जपून एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे. ही साने गुरूजींची शिकवण सेवादलाने आम्हाला शिकवली आहे. ती समाजवादाची शिकवण सर्वांमध्ये रूजून माणसातील भेदाची दरी कमी करण्याचा प्रयत्न मी गणेशोत्सवासारख्या विविध सणांतून करीत आहे. माझ्यासारख्या अनेक जणांच्या प्रयत्नातून एक दिवस हे जग नक्की एक होईल, असा मला विश्वास आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT