Anant chaturdashi 2024: भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णुची पूजा आणि उपवास केला जातो. तसेच गणपती बाप्पा जसे ढोल-ताशांच्या गजरात येतात त्याचप्रमाणे बाप्पाला निरोप देखील ढोल-ताशांच्या गजरात होत. धार्मिक मान्यतेनुसार अनंत चतुर्दशीचे व्रत आणि पुजा केल्याने सुख, समृद्धी आणि वैभव प्राप्त होते. म्हणून या दिवशी लोक मनोभावे पूजा करतात. पण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.
यंदा अनंत चतुर्दशी १७ सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे. याच दिवशी भगवान विश्वकर्मा यांची जयंती देखील साजरी केली जाते.
अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूच्या पूजेच्या वेळी चौदा ग्रंथी सुत्र त्यांच्यासमोर ठेऊन त्यांची पूर्ण विधीवत आणि मनोभावे पुजा करावी. भगवान विष्णूच्या मंत्रांनी हे अनंत सुत्र जागृत करून पुर्ण विधीपुर्वक पूजा केल्यानंतर हे चौदा मजली अनंत सुत्र पुरूषांच्या उजव्या हातावर आणि महिलांच्या डाव्या हातावर बांधावे.
हे अनंत सूत्र धारण केल्याने भगवान विष्णूची कृपा भक्तांवर राहते आणि सुख,समृद्धी आणि वैभव प्राप्ती होते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला देवाचा विशेष आशीर्वाद हवा असेल तर तुम्ही या खास उपायांचा अवलंब करू शकता.
सकाळी लवकर उठून स्नान करावे.
स्वच्छ कपडे घालून भगवान विष्णूची पूजा करावी.
मद्यपान आणि मांसहार करणे टाळावे.
नखे कापू नका.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.