Ganesh Chaturthi  sakal
Ganesh Chaturti Festival

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीला मूर्तीची स्थापना करताना हे नियम जाणून घ्या, गणपती बाप्पा होतील प्रसन्न

गणेशाची मूर्ती खरेदी करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवा.

Aishwarya Musale

दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीपासून १० दिवसांचा गणेश उत्सव साजरा केला जातो. यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला सुरू होईल आणि 28 सप्टेंबरला अनंत चतुर्थीला संपेल. घरोघरी आणि मंडपात गणेश चतुर्थीनिमित्त मोठ्या थाटामाटात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. त्याची 10 दिवस विधीपूर्वक पूजा केली जाते.

श्रीगणेश भक्तांचे गणेश चतुर्थीच्या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्याने सर्व संकट दूर करतात त्यांना सुख, समृद्धी आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात. या गणेश चतुर्थीला तुमच्या घरी गणपतीचे मोठ्या आनंदात स्वागत करायचे असेल तर त्यांची मूर्ती खरेदी करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवा.

दिशेकडे लक्ष द्या : गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करताना दिशेची विशेष काळजी घ्या. गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे खूप शुभ मानले जाते. घराच्या दक्षिण दिशेला मूर्ती ठेवू नका. ईशान्य कोपर्‍यातही गणेशाची मूर्ती ठेवू शकता.

श्रीगणेशाची सोंड : श्रीगणेशाची सोंड डाव्या  बाजूला असावी. अशा मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घरात धन-समृद्धी, शांती यांची कमतरता भासत नाही आणि घरातील सर्व सदस्यांची प्रगती होते.

अशी मूर्ती घरी आणा : गणपतीची मूर्ती घरी आणताना मूर्तीसोबत त्याच्या हातात मोदक आणि त्याचे वाहन मुषक असणे आवश्यक आहे, कारण मोदक हे गणेशाला अतिशय प्रिय आहेत.

गणपतीची मूर्ती : गणपती बाप्पाची बसलेल्या स्थितीत असलेली मूर्ती सर्वात शुभ मानली जाते. असे मानले जाते की ही मूर्ती घरी आणल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे सौभाग्य वाढते. सर्व कार्यात यश मिळते आणि घरात सुख-शांती नांदते. ज्या घरात गणपती उभा आहे, त्या घरात कधीही अशा मूर्तीची स्थापना करू नका.

गणेशजींच्या मूर्तीचा रंग : तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणू शकता, परंतु सिंदूरी लाल,आणि पांढर्‍या रंगाची गणेशमूर्ती घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "भाजपचा नोट जिहाद सुरु"; विनोद तावडे प्रकरणावर ठाकरेंची कडवी प्रतिक्रिया

Virar : क्षितीज ठाकूर यांनी दाखविलेल्या डायऱ्यांमध्ये नेमके काय? नावांपुढे लिहिले...

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Latest Marathi News Updates : पराभवाच्या भीतीने भाजप आणि विनोद तावडेंना बदनाम करण्याचा प्रयत्न - चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT