modak  sakal
Ganesh Chaturti Festival

Ganesh Chaturthi 2023: चॉकलेट मोदक की उकडीचे मोदक?

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील तुम्ही गणपतीला चॉकलेट मोदकांचा प्रसाद देणार असाल तर थांबा

सकाळ डिजिटल टीम

आहारतज्ञ दिनराज मोहिनी आपोणकर

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील तुम्ही गणपतीला चॉकलेट मोदकांचा प्रसाद देणार असाल तर थांबा!! कारण यामुळे तुम्हाला वजन वाढ, रक्त शर्करेत वाढ(ब्लड शुगर), फॅटी लिव्हर, कमजोरपणा, डिप्रेशन, पिंपल्स यासारख्या आजारांना सामोरे जावे लागू शकते.

कारण चॉकलेट मोदक चवीला चांगले लागत असले तरीही पारंपारिक उकडीच्या मोदकातून मिळणारे पोषक अन्नघटक त्यातून मिळत नाही. चला तर जाणून घेऊया चॉकलेट मोदक आणि उकडीचे मोदक यातून आपल्याला नेमकं काय मिळतं.

चॉकलेट मोदक : (100 ग्रॅम ) 

  • कॅलरी :५६९.९ कॅलरीज

  • कर्बोदके (कार्बोहायड्रेट ): ५८ ग्रॅम ( यापैकी साखर पन्नास ग्राम)

  • प्रथिने ( प्रोटीन ) : ३.५ ग्रॅम

  • स्निग्धता ( फॅट) : ३६.१ ग्रॅम

  • सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड :३४.३ ग्रॅम

  • ट्रान्स फॅटी ऍसिड:  ०.१ग्रॅम 

  • फायबर : ०.० ग्रॅम

उकडीचे मोदक : ( 100 ग्रॅम ) 

  • कॅलरी : ४३६ कॅलरीज

  • कर्बोदके (कार्बोहायड्रेट ): ५४.७ ग्रॅम ( यापैकी साखर ३.७ ग्राम)

  • प्रथिने ( प्रोटीन ) : ५.५ ग्रॅम

  • स्निग्धता ( फॅट) : २२.६ ग्रॅम

  • सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड :१८.२ ग्रॅम

  • ट्रान्स फॅटी ऍसिड:  ०.० ग्रॅम 

  • फायबर : ५.५ ग्रॅम

  • ( खालील माहिती दोन हजार किलो कॅलरीजच्या आहारावर आधारित)

  • व्हिटॅमिन A: ०.९%

  • कॅल्शियम: ३.०%

  • विटामिन सी : ३.५%

  • लोह : ७.९%

वरील माहिती वाचून आपल्याला इतके लक्षात आले असेल की, चॉकलेटच्या मोदकात उकडीच्या मोदकापेक्षा जास्त कॅलरीज असतात. आणि चॉकलेटच्या मोदकात प्रोटीनचे प्रमाण कमी असून, फॅटस् चे प्रमाण उकडीच्या मोदकाहून जास्त असते. याशिवाय पचनासाठी आवश्यक असणारे फायबर (तंतू) चॉकलेटच्या मोदकात आढळत नाहीत. आता आपण या सर्व पोषक घटकांचा शरीरातील  वेगवेगळ्या अवयवांवर नेमका काय परिणाम होतो ते पाहूया.

वजन

चॉकलेट मोदकात उकडीच्या मोदकापेक्षा अधिक कॅलरीज असल्याने, त्याच्या अती सेवनामुळे वजन वाढ होऊ शकते. कारण चॉकलेटमध्ये सिम्पल शुगर अधिक प्रमाणात असते. परिणामी याचा परिणाम भूक नियंत्रित करणाऱ्या लेप्टिन नावाच्या हार्मोन वर होतो. त्यामुळे चॉकलेट मोदक कितीही खाल्ल्याने भूक भागत नाही आणि पर्यायाने आपण गरजेपेक्षा जास्त खाऊ लागतो. या  सगळ्याचा थेट परिणाम वजन वाढीवर होऊन डायबिटीस आणि हृदयरोगाची शक्यता वाढू शकते. 

हृदय:

"फॅट्स" आपल्या शरीरासाठी वाईट असतात असा एक सर्वसाधारण समज आहे. परंतु विटामिन ए, डी, इ, के शोषून घेण्यासाठी शरीराला फॅटची आवश्यकता असते. चॉकलेट आणि उकडीचे मोदक या दोन्हीमध्ये फॅट्स मुबलक प्रमाणात असतात. परंतु उकडीच्या मोदकात खोबऱ्याचा वापर केल्यामुळे त्यात MCT हे फॅट्स अधिक प्रमाणात असतात.

जे शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवून, रक्तदाब नियंत्रित ठेवायला देखील मदत करतात. याशिवाय उकडीच्या मोदकामध्ये तूप टाकल्याने विटामिन ए देखील शरीराला मुबलक प्रमाणात मिळते. याउलट चॉकलेटच्या मोदकात शरीराला हानिकारक असणारे ट्रान्स फॅट काही प्रमाणात असल्याने त्याचा विपरीत परिणाम हृदयसंस्थेवर होऊ शकतो.

पचनसंस्था :

" ज्याचे पोट चांगले त्याचे आरोग्य चांगले" असे आपले आयुर्वेद सांगते. अर्थात ते खरे आहे. उकडीच्या मोदकातील सारण हे तुपामध्ये बनवलेले असल्याने त्याच्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते. ज्यामुळे शरीरातील घातक घटक शरीराबाहेर फेकण्यास मदत होते. याशिवाय खोबऱ्यातील फायबरमुळे आतड्यांमध्ये राहणाऱ्या चांगल्या बॅक्टेरियांना अन्न मिळते.

ज्याचा थेट परिणाम आपली प्रतिकारशक्ती सुधारण्यावर होतो. चॉकलेटच्या मोदकात तूप आणि फायबर या दोन घटकांची कमी असते. त्यामुळे पचनसंस्थेला त्यातून आवश्यक ते पोषण मिळत नाही, आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढते.

मेंदू

आहारामध्ये सिंपल शुगर अती जास्त प्रमाणात असल्यास त्याच्या परिणाम तुमच्या भावनांवर आणि मेंदूवर होऊ शकतो. पबमेड या सायंटिफिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार 67 ग्रॅमहून अधिक सिम्पल शुगरचे सेवन करणाऱ्या माणसांमध्ये डिप्रेशनचा धोका, चाळीस ग्रॅम सिंपल शुगरचे सेवन करणाऱ्या माणसांपेक्षा 23 टक्क्यांहून अधिक असतो. त्यामुळे चॉकलेट मोदकाचे अतिसेवन करताना विचार केलेला बरा!


त्वचा :

चॉकलेट मोदकात जास्त प्रमाणात आढळणाऱ्या सिम्पल शुगरच्या अती सेवनाचा परिणाम जसा मेंदूवर होतो तसाच तो पेशींवरही होतो. ही शुगर शरीरात गेल्यावर त्याचा प्रोटीनशी संबंध येऊन त्यातून काही घातक पदार्थ तयार होतात. जे पेशींना तरुण ठेवणाऱ्या कोलाजन आणि इलॅस्टीन या दोन घटकांना हानी पोहोचवतात.

ज्यामुळे तुमच्या त्वचेचे तेज नाहीसे होऊन चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. याउलट उकडीच्या मोदकात असलेल्या तुपामुळे डार्क सर्कल आणि पिंपल नाहीसे होऊन, त्वचा सुंदर दिसते. विटामिन ए आणि ई हे घटक देखील तुपामध्ये मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारायला मदत होते.

एकंदरीतच चॉकलेट मोदक आणि उकडीचे मोदक यांच्या तुलनेतून असे लक्षात येते की, चॉकलेटच्या मोदकात उकडीच्या मोदकांसारख्या आरोग्यदायी गुणधर्मांची कमी आढळते. त्यामुळे यावर्षी गणपतीच्या प्रसादात पुन्हा एकदा पारंपारिक उकडीच्या मोदकांचा समावेश केल्यास आरोग्याला लाभ होईल यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT