Ganesh Chaturthi Puja Sakal
Ganesh Chaturti Festival

Ganesh Chaturthi Puja: गणपती पूजेत लागणाऱ्या साहित्याची आजच करा यादी, आयत्यावेळी होणार नाही गडबड

पुजा बोनकिले

Ganesh Chaturthi Puja: महाराष्ट्रात पुणे, मुंबईसह अनेक राज्यांमध्ये गणेशोत्सव ढोल-ताशांच्या गजरात साजरा केला जातो. यंदा ७ सप्टेंबरला गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यामुळे लाडक्या बाप्पांच्या आगमनाची आतुरता सर्वांना लागली आहे.

बाप्पाच्या स्वागतासाठी घरोघरी तयारी केली जात आहे. बाजारपेठही सजली आहे. वेगवेगळ्या आकारांतील आकर्षक मूर्ती बाजारात पाहायला मिळत आहेत. दहा दिवस चालणारा गणपती उत्सव देशभरात जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी काळात प्रत्येक घरात गणपती बाप्पांची स्थापना केली जाते आणि मनोभावे पूजा केली जाते.

कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात गणपती बाप्पांची पूजा करून केली जाते. मान्यतेनुसार असे केल्यास कामामध्ये यश मिळते. गणेशोत्सवात विघ्नहर्ताची मनोभावे पूजा केल्यास अनेक संकटांमधून सुटका होते.

गणेशोत्सवादरम्यान गणपती बाप्पांची सकाळ- संध्याकाळ पूजा केली जाते. अशावेळी आयत्यावेळी गोंधळ आणि गडबड होऊ नये म्हणून आरतीसाठी कोणत्या साहित्याची गरज असते हे जाणून घेऊया.

गणपती पूजेत लागणाऱ्या साहित्याची यादी

  • चौरंग आणि पाट

  • बसण्यासाठी आसनं

  • ताम्हण

  • तांब्या

  • पळी आणि पंचपात्र

  • शंख

  • घंटा

  • अगरबत्तीचं घर

  • निरांजन

  • समई

  • फुलवाती आणि समईच्या वाती

  • निरांजन

  • समईत घालायला तूप /तेल

  • धूप आणि अगरबत्ती

  • काडेपेटी

  • हळद-कुंकु

  • अष्टगंध

  • शेंदूर

  • अक्षता

  • रांगोळी

  • अत्तर

  • भिमसेन कापूर

  • सुपाऱ्या

  • खारीक

  • अक्रोड

  • हळकुंड

  • बदाम

  • कापसाची माळवस्त्र

  • जानवी जोड

  • सुक्या खोबऱ्याची वाटी आणि गूळाचा खडा नैवेद्यासाठी

  • नारळ

  • विड्याची पानं

  • बाप्पाच्या अभिषेकासाठी पंचाळ्यात किंवा ५ वाट्यांमध्ये वेगवेगळे काढून ठेवलेलं दुध, दही, तूप, साखर आणि मध

  • फळं – ५ प्रकारची

  • मिक्स फुल

  • दुर्वा

  • शमीपत्र

  • बेल

  • आंब्याची डहाळी

  • बाप्पासाठी फुलांचा हार /कंठी

  • नैवेद्यासाठी खिरापत /मोदक / पंचखाद्य / खडीसाखर

  • सुट्टे पैसे

वर दिलेले साहित्य घरात किती प्रमाणात आहे हे चेक करावे आणि नंतरच खरेदी करायाला जावे. यामुळे वस्तु डबल होणार नाही. तसेच या यादीतील कोणतेही साहित्य खराब होणार नाही. बाजारात जाण्यापुर्वी साहित्याची यादी सोबत ठेवावी. आजकाल अनेक लोक फोनमध्येच यादी करतात. पण गर्दीच्या ठिकाणी फोन चोरीला जाण्याची भिती असते. यामुळे बाजारात जाताना यादी कागदावर तयार करावी.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup Final: न्यूझीलंडच्या पोरींनी जिंकला वर्ल्ड कप ! दक्षिण आफ्रिका ५ महिन्यात दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, कामगारांवर गोळीबार, 3 मजुरांचा मृत्यू तर 2 जखमी

विधानसभेसाठी भाजपची यादी जाहीर, देवेंद्र फडणविसांना पुन्हा संधी, प्रतिक्रिया देत म्हणाले...

Vidhansabha Election : समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन! कपिल पाटलांचा खर्गेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

KL Rahul ची कसोटीमधून निवृत्ती? 'त्या' व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण, खराब फॉर्ममुळे निर्णय घेतल्याचा दावा

SCROLL FOR NEXT