Ganesh Decoration esakal
ganesh darshan

Ganesh Decoration : बाप्पाच्या आगमनाला उरलेत अवघे 2 दिवस, बाप्पासाठी असा बनवा इकोफ्रेंडली मखर अन् आरास

बाप्पासाठी नेमकं कसं डेकोरेशन करायचं, मखर कसा बनवायचा याची तुम्हाला क्रिएटिव्ह कल्पना हवी असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच.

साक्षी राऊत

Ganesh Chaturthi 2023 : तुम्हा आम्हा सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन येत्या मंगळवारी म्हणजेच १९ सप्टेंबरला होणार असून सगळेजण बाप्पाच्या स्वागताच्या तयारीसाठी सज्ज झाले आहेत. बाप्पासाठी नेमकं कसं डेकोरेशन करायचं, मखर कसा बनवायचा याची तुम्हाला क्रिएटिव्ह कल्पना हवी असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच.

बाप्पाच्या सजावटीत सगळ्यात महत्वाचा असतो तो मखर. बाप्पाचा मखर अगदी क्रिएटिव्ह असावा असा प्रत्येकाचाच अट्टाहास असतो. मार्केटमध्ये तुम्हाला बरेच थर्माकॉलचे मखर दिसतील. मात्र हल्ली लोकांचा कल इकोफ्रेंडली मखरांकडे जास्त असल्याने त्याच्यापण वेगवेगळ्या डिझाइन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

इकोफ्रेंडली मखरासाठी या काही आयडियाज

सध्या फुलांच्या मखराची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. बाजारात इकोफ्रेंडली साहित्यापासून तयार केलेल्या कृत्रिम फुलांचेही गणपती तुम्हाला बघायला मिळतील. फुलांपासून बनवलेले झुंबर, कमानी, रथ, अर्धचंद्र असे अनेक पर्याय तुम्हाला बाजारात मिळतील. विशेष म्हणजे तुम्ही या फुलांचा परत वापर करू शकता. (Ganesh Chaturthi)

कागदापासून मखर

बरेचदा लोक वृत्तपत्रे भरपूर जमा झालीत की रद्दीत विकून देतात. पण तुम्ही त्याचा वापर मखर बनवण्यासाठी करू शकता.

कलरफुल साड्यांपासून मखर बनवा

गणरायासाठी साड्यांचा किंवा कापडाचा वापर करून मखर तयार करता येऊ शकतो. अगदी कमी पैशांत तुम्ही साड्यांचा शोभून दिसणारा मखर बनवू शकता. पैठणी साडी असेल तर पैठणीच्या पदराचा भाग बाप्पाच्या मागे शोभून दिसेल. तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या ओढण्यांचा वापर करूनसुद्धा मखर बनवू शकता.

मातीपासून मखर

तुम्ही कुंभाराकडून मातीचा क्रिएटिव्ह मखरसुद्धा बनवून घेऊ शकता. हा पूर्णपणे इकोफ्रेंडली असून बघायलासुद्धा आकर्षक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "भाजपचा नोट जिहाद सुरु"; विनोद तावडे प्रकरणावर ठाकरेंची कडवी प्रतिक्रिया

Virar : क्षितीज ठाकूर यांनी दाखविलेल्या डायऱ्यांमध्ये नेमके काय? नावांपुढे लिहिले...

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Latest Marathi News Updates : पराभवाच्या भीतीने भाजप आणि विनोद तावडेंना बदनाम करण्याचा प्रयत्न - चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT