Ganesh Visarjan 2024:  Sakal
ganesh darshan

Ganesh Visarjan 2024: विसर्जन गणपती बाप्पांचे, सुरक्षितता गणेशभक्तांची, प्रशासनाचे खबरदारी बाळगण्याचे आवाहन

Ganesh Visarjan 2024: दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा होतो. यंदाही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेश मंडळांनी आता जुन्या पद्धती सोडून नवनवीन उपक्रमांची कास धरली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Ganesh Visarjan: बाप्पाचे विसर्जन आपण पाण्यात करतो व दरवर्षी अनेक ठिकाणी विसर्जनाप्रसंगी भक्तांचा पाण्यात बुडून दुःखद घटना घडतात. त्या होऊ नये म्हणून गणेशभक्तांनी काही काळजी घेणे आवश्यक आहे.

दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा होतो. यंदाही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेश मंडळांनी आता जुन्या पद्धती सोडून नवनवीन उपक्रमांची कास धरली आहे. त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह क्रीडा स्पर्धा व जनजागरण कार्यक्रमांवर भर दिला आहे. यंदा निसर्गानेसुद्धा भरभरून प्रतिसाद दिला असून सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने सर्वच ठिकाणचे जलस्रोत तुडुंब भरले आहेत.

दरम्यान, सर्व गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्ती स्थापनेपासून ते विविध उपक्रमांसह बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक व कुठे विसर्जन करायचे याचे संपूर्ण नियोजन केले आहे. काही ठिकाणी बाप्पाचे विसर्जन दीड दिवसात, तर काही ठिकाणी पाच दिवसांत विसर्जन झाले. आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या विसर्जनाची जय्यत तयारी सुरू आहे.

मंगळवारी (ता.१७) गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वच गणेशभक्त जल्लोषात बाप्पाचे विसर्जन करतील. यात वाद्याच्या तालावर नृत्याचा मनमुराद आनंद लुटत मिरवणूक विसर्जन स्थळी पोचेल.

यावेळी बाप्पाची मनोभावे पूजा-आरती झाल्यावर विसर्जन करण्यासाठी घाई केली जाते व अशावेळी अति उत्साहाच्या भरात आड, विहीर, बारव, डोह, खदान, बंधारा, नदी, तलाव, सरोवर, तळे किंवा आता पावसामुळे मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामध्ये गणरायाचे विसर्जन करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अशी घ्या काळजी

बाप्पाचे विसर्जन प्रशासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणीच करावे.

निर्माल्य संकलन केंद्रावरच जमा करावे.

वाहत्या पाण्यात जाऊ नये. अति धाडस करू नये.

नैसर्गिक अपरिचित जलस्रोताजवळ जाऊ नये.

पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगी असणाऱ्या जलस्रोतात विसर्जन करू नये.

चिखलात पाय फसण्याची दाट शक्यता असते.

पाण्यात गेल्यावर एकमेकांवर गुलाल उधळू नये.

भक्तांच्या सुरक्षिततेचे उपाय

विसर्जन करताना जलस्रोताच्या अगदी जवळ जाऊ नये.

गणेश मंडळानी विसर्जनावेळी कोणती मंडळी पुढाकार घेणार आहे,

ते आधीच निश्चित करावे.

मोजक्या व अनुभवी मंडळींनीच गणपती विसर्जन करावे.

पोहता येत असेल तरच पाण्यात जावे.

विसर्जनाच्या वेळी एकमेकाला धक्काबुक्की करू नये.

विसर्जन झाल्यावर मूर्ती पूर्णपणे बुडायलाच हवी असा अट्टहास करू नये.

दहा दिवस मोठ्या उत्साहात व श्रद्धापूर्वक साजरा केलेल्या गणेशोत्सवाचा शेवटही आनंददायी व सुखरूप व्हावा म्हणून भक्तांनी योग्य अशी काळजी गणपतीरायांच्या विसर्जनाच्या वेळी घ्यावी. शांततेने विसर्जन करावे.

- राजेश भोसले, प्रमुख, जलतरण साक्षरता अभियान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT