Nanded News 
ganesh darshan

भक्तांच्या हाकेला धावणारा सत्यगणपती

लक्ष्मीकांत मुळे

नांदेड शहरापासून उत्तरेला आवघ्या दहा किलोमीटर अंतरावरील भोकरफाटा परिसरातील सत्यगणपती देवस्थान लाखो गणेश भक्तांचे श्रद्धास्थान झाले आहे.मराडवाड्यातील एक जागृत देवस्थान म्हणून गणेश भक्तांची श्रध्दा आहे. इतकेच नव्हे तर शजारील तेलंगना राज्यातील गणेश भक्त न चुकता वर्षातून एकदा तरी दर्शनासाठी येतात.भक्तांची आपार श्रध्दा आसल्यामुळे दरमहिन्याच्या संकष्ट चतुर्थिला भक्तांची आलोट गर्दी होत आसते.सत्य भक्तांच्या हाकेला धावून जाणारा गणपती म्हणून सत्यगणपती आसे नावलौकिक भक्तात आहे.

नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सत्यगणपती देवस्थानाचे मंदिर पुर्वाभिमुख असून या मंदिराचा लोकवर्गणीतून 1994 मध्ये जीर्णोध्दार करण्यात आला .अर्धापूर तालुक्यातील दाभड ,जांभरूण ,अर्धापूर,बामणी ,शैलगाव ,पिंपळगावासह पंचक्रोशीतील गणेश भक्तांनी पुढाकार घेवून मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला.

मंदिराचे बांधकाम होण्यापुर्वी पिंपळाच्या झाडाखाली एक छोटा पार होता.या परावर कमान आसलेले छोटेशे मंदिर होते. नांदेड - नागपूर हा महामार्ग होण्यापुर्वी मंदिरा समोरून गाडी वाट होती.तसेच मंदिरा समोर एक विहीर आहे. या वाटेवरून जाणारे पांथस्थ आपल्या जवळची शिदोरी खाऊन काही काळ पारावर विसावा घेत असत. मंदिरा समोर आजही विहीर आहे. काही मोजकेच गणेश भक्त श्रावण महिण्यात दर्शनासाठी येत असत.

या मंदिराचा गणेश जयंतीला 1994 लोकार्पण सोहळा झाला. तेंव्हापासून गणेश जयंतीला यात्रा भरत आहे. दरमहिन्याच्या संकष्ट चतुर्थीला , श्रावणातील चतुर्थी, अंगारकी योगला   गणेश भक्तांची खुप गर्दी होत आसते. नांदेड, हिंगोली, परभणीसह परिसरातील भक्त दिंड्या काढून पायी दर्शनासाठी येता. सकाळच्या वेळी सगळे रस्ते फुलून जातात . या दिंड्यांचे ठिकठिकाणी स्वागत करून चहा , पाणी, फराळ याची व्यवस्था संस्था, दानशूर व्यक्ती करित सातात.

मंदिराचे व्यवस्थापन अर्धापूर तहसिल प्रशासनाकडे आहे. दररोज सकाळी व संध्याकाळी आरतीपुजा केली जाते.गणेशोत्सवाच्या काळात व सण उत्सवाच्या वेळी विशेष विद्युत रोषणाई करण्यात येते.तसेच विविध धार्मिक कार्याचे आयोजन करण्यात येते. गणेश भक्त आपली इच्छापुर्ती झाल्यावर चांदीचा गणपती,दुर्वां,मुकूट ,पितांबर ,आनन्नदान ,रोख रक्कम दान करित आसल्यामुळे हे देवस्थान करोडपती झाले आहे.घरात मंगलकार्य झाले कि वधूवर सर्वप्रथम सत्यगणपतीच्या दर्शनाला जाणे ही एक परंपरा झाली आहे.तसेच घरात काही मंगलकार्या ठरले की पहिली निमंत्रण गणपतीला दिले जाते.

भक्तांच्या देणगीतून मंदिरचा विकास करण्यात आला आहे.तसेच देवस्थान सामाजिक कार्यात मदत करित आसते. कोरोनाच्या संकटात या संस्थानाच्या वतीने 25 लाखांचा निधी मुख्यमंत्री साह्यता निधीला देण्यात आला आहे. मंदिरात भक्तांची सतत वर्दळ आसते. मंदिराचा जीर्णोध्दार झाल्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.दरमहिन्याच्या संकष्ट चतुर्थीला विविध प्रकारची दुकाने लावण्यात येतात.यातून लाखो रूपयांची उलाढाल होवून मंदिराच्या देनगीत भरपडीच शिवाय रोजगार ही उपलब्ध होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम; आता एक व्हावं लागेल'

Latest Maharashtra News Updates live : छत्तीसगढच्या कांकेरमध्ये ५ नक्सलवाद्यांचा खात्मा

Government Job : सरकारी नोकरी मिळवण्याचे सोपे मार्ग: भारतातील ९ सर्वात सोप्या सरकारी परीक्षा

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

SCROLL FOR NEXT