Ganeshotsav 2022 Pune Municipal Corporation 
Ganesh Chaturti Festival

Ganeshotsav 2022 : विसर्जन घाटांवर महानगरपालिकेकडून सुविधा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दोन वर्षांचा खंड पडल्यानंतर पुणेकर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तयार आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मांडव उभारणीसह सजावटी, तसेच घरोघरीही गणपतीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. महापालिकेने विसर्जन घाटांवर विसर्जन हौद, विद्युत व्यवस्था पुरविली असून जीवरक्षकही तैनात केले आहेत. याशिवाय, मूर्ती संकलन केंद्रांची सुविधा पुरविली आहे.

कोरोनामुळे दोन वर्षे निर्बंध असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला. मंडळांनी मांडवाऐवजी मंदिरातच गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. देखावे, मिरवणुका यावर पूर्ण बंदी असल्याने पुण्यात शिस्त पाळून साधेपणाने उत्सव साजरा केला. मात्र, आता कोरोनाचे मळभ दूर झाल्याने निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

कोरोनामुळे नागरिकांना घराबाहेर बाहेर पडण्याची परवानगी नव्हती, त्यासाठी महापालिच्या घनकचरा विभागासह क्षेत्रीय कार्यालयांकडून फिरत्या विसर्जन हौदाची सुविधा केली. तसेच, अडीचशेपेक्षा जास्त मूर्ती संकलन केंद्र व निर्माल्य संकलन केंद्र उभे केले होते. यंदाही महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून फिरत्या हौदांची व्यवस्था केली आहे, निर्बंध नसताना फिरते हौद कशासाठी? अशी टीका होत असली; तरीही महापालिकेने दीड कोटींची निविदा काढली आहे.

‘पीओपीऐवजी घ्या शाडूच्या मूर्ती’

यंदापासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी आणली आहे. पण, त्याची अंमलबजावणी महापालिकेला करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे केवळ पीओपीच्या मूर्ती वापरू नयेत असे आवाहन महापालिकेने केले आहे. शहराच्या सर्वच भागात पादचारी मार्ग, रस्ते, मोकळ्या ठिकाणी स्टॉल लावून पीओपीच्या मूर्ती विक्री सुरू झाली आहे. पीओपीच्या मूर्ती तयार करताना घातक रासायनिक घटकांचा वापर केलेला असतो. त्यामुळे नैसर्गिक जलस्रोत दूषित होत आहेत. नागरिकांनी शाडूच्याच मूर्ती घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

माती संकलन करणार

शाडूच्या मूर्ती विसर्जित केल्यानंतरही माती संकलन करण्यासाठी महापालिका यंदापासून सामाजिक संस्थांच्या मदतीने ‘पुनरावर्तन’ उपक्रम राबविणार आहे. ही माती खत तयार करण्यासाठी वापरली जाणार असून, महापालिकेचे उद्यान व शेतीसाठी हे खत दिले जाणार आहे.

  • फिरत्या विसर्जन हौदांची संख्या ः १५०

  • मूर्ती संकलन केंद्र ः १९१

  • निर्माल्य संकलन केंद्र ः २८०

  • गणेश मूर्ती विसर्जन ठिकाण ः ३०३

नटेश्‍वर घाट, पांचाळेश्‍वर घाट येथे मानाच्या गणपतीच्या विसर्जनाची सुविधा आहे. वृद्धेश्‍वर घाटावर मोठी गर्दी होते, त्यामुळे येथे विसर्जन टाक्यांचीही सुविधा असेल. अग्निशामक दलाचे जीवरक्षक तैनात केले आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये व घाटांवर मूर्ती संकलन केल्यानंतर सन्मानपूर्वक त्यांच्या विघटनाची प्रक्रिया केली जाईल. कोथरूडमध्ये १९ ठिकाणांवर ३८ विसर्जन टाक्या आहेत. समाविष्ट गावांमध्येही सुविधा पुरविल्या आहेत.

- नितीन उदास, उपायुक्त, परिमंडळ दोन

दीड दिवसाच्या गणपतींचे घराजवळील महापालिकेच्या टाक्या, हौदात विसर्जन करावे. फिरते हौद पाचव्या दिवसापासून विसर्जनासाठी उपलब्ध करून दिले जातील. या फिरत्या हौदांना जीपीएस लावून ते दिवसभरात कुठे फिरले याची माहिती ठेवली जाणार आहे. तसेच, या गाड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक कर्मचारी नियुक्त केला जाणार आहे. शहरात मूर्ती संकलन केंद्र, निर्माल्य संकलन केंद्रांची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी या सुविधांचा वापर करावा.

- आशा राऊत, उपायुक्त, घनकचरा विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT