Ganpati Visarjan Miravnuk Kolhapur esakal
Ganesh Chaturti Festival

Ganpati Visarjan Miravnuk : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत तुफान राडा; दोन मंडळांत जोरदार हाणामारीसह दगडफेक, तिघे जखमी

पोलिसांनी वेळीच दखल घेत दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांना पांगवल्याने अनर्थ टळला.

सकाळ डिजिटल टीम

पोलिसांनी खरी कॉर्नरकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिस गाडी लावून दंगा करणाऱ्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणूक (Ganpati Visarjan Miravnuk Kolhapur) मुख्य मार्गात आधी प्रवेश करण्यावरून दोन मंडळांच्या (Ganesh Mandal) कार्यकर्त्यांत रात्री साडेअकराच्‍या दरम्‍यान जोरदार वाद व हाणामारी झाली. त्यातून दगडफेकही झाली. यात देखावे पाहण्यासाठी आलेल्या दोघांसह एकूण तिघे जखमी झाले.

पोलिसांनी वेळीच दखल घेत दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांना पांगवल्याने अनर्थ टळला; मात्र या प्रकाराने खरी कॉर्नर (Khari Corner) परिसरात तणाव निर्माण झाला होता. विसर्जन मिरवणुकीत वेळीच प्रवेश मिळावा, यासाठी काही मंडळांनी रात्रीच ट्रॅक्टर- ट्रॉली देखावा सजावटीचे साहित्य घेऊन मिरवणूक मार्गावर येण्यास सुरुवात केली होती.

दांडगाईवाडीकडील एका मंडळाची ट्रॉली व कार्यकर्ते खरी कॉर्नरकडून मुख्य मार्गाकडे येण्याचा प्रयत्न करीत होते. याचवेळी खरी कॉर्नरजवळ थांबलेल्या दुसऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यातून वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर मारामारीत झाले. पाठोपाठ दगडफेक सुरू झाली.

देखावे पाहण्यासाठी कुटुंबीयांसमवेत आलेले लोक सैरावैरा धावू लागले. दगडफेकीत तिघे जखमी झाले. याच वेळी बंदोबस्तासाठी असलेले पोलिसांचे (Police) पथक घटनास्थळी धावले. त्यांनी लाठ्या उगारत कार्यकर्त्यांना पांगवले. याच वेळी पोलिसांची आणखी एक तुकडी तेथे दाखल झाली.

पोलिसांनी खरी कॉर्नरकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिस गाडी लावून दंगा करणाऱ्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. याच वेळी काही कार्यकर्ते वाद घालू लागल्याने त्यांना ताब्यात घेण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतला. तेव्हा कार्यकर्ते बाजूला गेले. जखमी झालेल्या तिघांना खासगी वाहनातून रुग्णालयात नेण्यात आले.

या प्रकारामुळे देखावे पाहण्यासाठी आलेल्यांची मोठी पळापळ झाली. यात देखावे पाहण्यासाठी आलेल्यांपैकी दोघे जखमी झाले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिसात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT