Konkan Ganeshotsav Ganpati Decoration esakal
Ganesh Chaturti Festival

Konkan Ganeshotsav : 'गाईपासून मिळणारं दूध, शेण, गोमूत्र आरोग्यदायी'; देवरूखात देखाव्यातून दिला गोपालनाचा संदेश

त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रमोद हर्डीकर

करंबेळे परिवाराने हा देखावा बनविण्यासाठी कागदी तक्ते, प्लायवूड, कार्डपेपर, नैसर्गिक गवत, कापडी पडदे अशा पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला आहे.

साडवली : देवरुख गुरुकुल नगरचे रहिवासी शिक्षक सुनील करंबेळे परिवाराने गणेशोत्सवानिमित्त ‘गोपालन व संवर्धन काळाची गरज’ हा देखावा शेतकऱ्यांनी गावठी गाईचे जास्तीत जास्त पालन करण्यासाठी उभा केला आहे. बेरोजगार तरुणांना नोकरीच्या मागे न लागता दूध व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन या निमित्ताने सुनील यांनी केले आहे.

करंबेळे परिवाराच्या घरगुती गणपतीमध्ये (Konkan Ganeshotsav) काढलेला देखावा लोकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामध्ये गाईच्या दुधाचे लहान मुले, तरुण, ज्येष्ठ व्यक्ती यांना होणारे उपयोग, गाईपासून मिळणाऱ्या शेण-गोमुत्र यांचे आरोग्यदायी उपयोग, दुधापासून तयार होणारे विविध अन्न पदार्थ, नांगरणीची बैलगाडी ओढणे किंवा छकडा गाडी ओढणे, बैलगाडी नांगरणी स्पर्धा यासाठी बैलांचे उपयोग त्रिमिती चित्राद्वारे उभे केले आहेत.

बेरोजगार तरुणांना नोकरीच्या मागे न लागता दूध व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन करून गाईसाठी एवढे करा, असा संदेश दिला आहे. त्यासाठी एक प्रबोधन तक्ताही लावलेला आहे. करंबेळे परिवाराने हा देखावा बनविण्यासाठी कागदी तक्ते, प्लायवूड, कार्डपेपर, नैसर्गिक गवत, कापडी पडदे अशा पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला आहे. निर्माल्यासाठी स्वतंत्र निर्माल्य कलशाचीही व्यवस्था केली आहे.

हा देखावा उभा करण्यासाठी किरण जोशी, प्रकाश व दिलीप करंबेळे, स्नेहल करंबेळे, प्रियांका, दिव्या करंबेळे, कुणाल, शंतनु शांताराम तिर्मळ, सुनीता निर्मळ, अमोल निर्मळ, गार्गी चिबडे यांचे सहकार्य लाभले आहे. गतवर्षी कोकणस्तरावर व्यास क्रिएशनमार्फत घेतलेल्या स्पर्धेत ‘माझे मत, माझा अधिकार’ या देखाव्याला प्रथम क्रमांक मिळाला होता. करंबेळे परिवार गेली पंचवीस वर्षे गणपतीनिमित्त विविध विषयांवर देखावे करून जनतेचे प्रबोधन करून उत्सव साजरा करीत आहेत. त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT