Konkan Ganeshotsav Bhajan Sawantwadi Road Accident esakal
Ganesh Chaturti Festival

Konkan Ganeshotsav : भजनानंतर गावाकडं परतताना काळाचा घाला; दुचाकीवर झाड कोसळून सख्खे चुलत भाऊ ठार

मंडळातून अभंग सादर करतानाचा राहुलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मृत दोन्ही तरुण एकाच कुटुंबातील सख्खे चुलत भाऊ होते. राहुल हार्मोनियम वादक होता. दोघेही गतवर्षीपासून सावंतवाडीतील मंडळात भजन सादर करण्यासाठी येत असत.

सावंतवाडी : भजन (Bhajan) आटोपून घरी परतत असताना धावत्या दुचाकीवर भेंडल्या माडाचे झाड कोसळून आंजिवडे (ता. कुडाळ) येथील दोघे तरुण जागीच ठार झाले. दोघेही सख्खे चुलत भाऊ होते. ही घटना शहरातील राजवाड्याजवळील परिमल टॉवरसमोर मंगळवारी (ता. २६) रात्री अकराच्या सुमारास घडली.

राहुल प्रकाश पंदारे (वय २४) व संभाजी दत्ताराम पंदारे (२१) अशी त्यांची नावे आहेत. या दुर्घटनेचे तीव्र पडसाद आज शहरात उमटले. दोषींवर कारवाई करावी व मृतांच्या कुटुंबीयांना भरपाईच्या मागणीसाठी राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

याबाबत अधिक माहिती अशी : गणेशोत्सवामुळे (Konkan Ganeshotsav) भजनाचा हंगाम सुरू आहे. राहुल आणि संभाजी भजन मंडळामध्ये सक्रिय असतात. शहरातील गोठण भागात त्यांना भजनासाठी आमंत्रित केले होते. गेले सहा-सात दिवस ते सायंकाळी भजनासाठी येत होते.

दोघेही आंजिवडेतील घरातून मंगळवारी सकाळी बाहेर पडले. येथे राहत असलेले त्यांचे नातेवाईक कृष्णा पंदारे यांच्या घरी दुपारचे जेवण उरकून सायंकाळी गोठण येथे ते भजनासाठी गेले. तेथे भजन आटोपून दोघेही दुचाकीने घरी आंजिवडे येथे येत होते. त्यांचे मित्र गौरव शिर्के त्यांच्यासोबत शहरातील चिटणीस नाक्यापर्यंत आले होते. तेथून ते परतले. यानंतर दोघेही पुन्हा माघारी आले. याच दरम्यान जोरदार पाऊस सुरू होता. ते राजवाड्याजवळील परिमल टॉवर रस्त्यावर आले.

तेथे वरच्या बाजूला असलेले भेंडल्या माडाचे मोठे झाड उन्मळून त्यांच्या दुचाकीवर कोसळले. या झाडाला लागून वीज खांब व वाहिन्या खाली आल्या. त्याने पुरवठा खंडित झाला. मोठा आवाज झाल्याने स्थानिक तेथे धावले. नेमकी स्थिती लक्षात येत नव्हती. दुचाकीवरील दोघे अडकल्याचे दिसत होते. स्थानिकांनी मदतकार्यासाठी हालचाली सुरू केल्या. घटना समजताच माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पालिकेला कळवले.

पालिकेचा बंब व रुग्णवाहिका घटनास्थळी आली. मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्यासह कर्मचारीही आले. या दरम्यान, शहरातील बऱ्याच भागामध्ये वीज पुरवठाही खंडित झाला होता. या दुर्घटनेची माहिती वाऱ्यासारखी परसली. घटनास्थळी गर्दी झाली. सामाजिक बांधिलकी संघटनेचे रवी जाधव, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, रॉक डान्टस, बाबा अल्मेडा, डॉ. मुरली चव्हाण यांनी मदतकार्यात भाग घेतला. यंत्राच्या सहाय्याने झाड हटविण्यास सुरुवात झाली.

मुसळधार पाऊस आणि काळोखामुळे त्यात अडथळे येत होते; परंतु नागरिकांनी त्याची पर्वा न करता झाड बाजूला करत मृतदेह बाहेर काढले. पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्यासह पथकाने परिस्थिती हाताळली. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. महावितरणचे कर्मचारीही घटनास्थळी आले. पोलिसांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.

मृतांची ओळख पटल्यानंतर नातेवाईकांना माहिती देण्यात आली. रात्री उशिरा आंजिवडे येथून त्या दोघांचे नातेवाईक येथे आले. त्यांनी मृतदेह पाहताच हंबरडा फोडला. रात्री उशिरा आंजिवडे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.

दरम्यान, या घटनेचे पडसाद आज शहरात उमटले. राजकीय पदाधिकारी, नागरिक तसेच आंजिवडेतील ग्रामस्थांनी पालिकेवर धडक देत मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला. जीर्ण झाडे हटविण्याची मागणी करुनही त्यावर कार्यवाही न झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप उपस्थितांनी केला. अखेर तेथे दाखल झालेल्या शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मध्यस्थीनंतर नागरिक शांत झाले.

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून भजनात सक्रिय

मृत दोन्ही तरुण एकाच कुटुंबातील सख्खे चुलत भाऊ होते. राहुल हार्मोनियम वादक होता. दोघेही गतवर्षीपासून सावंतवाडीतील मंडळात भजन सादर करण्यासाठी येत असत. यावर्षीही ते पहिल्या दिवसापासून येत होते. दोघांच्या बाबतीत घडलेली घटना ही हृदय पिळवटणारी असल्याची भावना येथील दशावतारी कलावंत व त्या दोघांचे मित्र गौरव शिर्के यांनी व्यक्त केली. राहुल उत्तम भजनी कलाकार होता. राहुल यांच्या माध्यमातून भाई शिर्के व गौरव शिर्के भजन सादरीकरण करत होते. त्यांच्या मंडळातून अभंग सादर करतानाचा राहुलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

माघारी का आले, याचे कारण अस्पष्ट

भजन आटोपल्यानंतर त्यांचे मित्र गौरव शिर्के दोघांना शहरातील चिटणीस नाका परिसरात सोडून परत गेले; मात्र यानंतर ते दोघेही दुचाकीने पुन्हा राजवाडा परिसरात माघारी आले. याच दरम्यान दुर्घटना घडली. ते परत माघारी का आले, हे स्पष्ट झाले नाही. यातील संभाजी यांची बहीण शहरात राहते. त्याने बहिणीला दूरध्वनी करून तुझ्याकडे जेवायला येतो, असे सांगितले होते, असे शिर्के यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून पुढे आले आहे.

पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून ते पुन्हा बहिणीकडे जाण्यासाठी मागे परतले होते, असेही सांगण्यात येते. काहींकडून मोबाईल विसरल्याने ते पुन्हा मागे आले, असे सांगण्यात येते. मात्र ते मागे का आले, हे नेमके समजू शकले नसले तरी काळाचा घाला त्यांच्यावर इतक्या दुर्दैवी पद्धतीने कोसळल्याने हळहळ व्यक्त होत होती.

कुटुंबावर आघात

राहुल गरीब कुटुंबातील असून प्रेमळ होता. त्याला भजनाची आवड होती. तो उत्कृष्ट गायक होता. तो, गोव्याला एका कंपनीत कामाला होता. आई, वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ व विवाहित बहीण आहे.

कुटुंबावर आघात

राहुल गरीब कुटुंबातील असून प्रेमळ होता. त्याला भजनाची आवड होती. तो उत्कृष्ट गायक होता. तो, गोव्याला एका कंपनीत कामाला होता. आई, वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ व विवाहित बहीण आहे.

गंभीर दुखापतीने मृत्यू

दुर्घटनेवेळी झाडासोबत वीजवाहिन्याही खाली आल्या होत्या. झाडाखाली चिरडून दोघांचा मृत्यू झाला की वीज वाहिन्यांना स्पर्श झाल्याने हे स्पष्ट होत नव्हते. उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. निखिल अवधूत यांनी पहाटे शवविच्छेदन केले. झाडाखाली सापडून गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर एवळे यांनी सांगितले. या घटनेचा पंचनामा करुन येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT