Ganpati Festival Sakal
ganesh-festival

Ganeshotsav 2023: महाराष्ट्रातल्या 'या' भागात टिळकांनी सुरुवात करण्याच्या आधीच गणेशोत्सव सुरू झाला होता!

इथे गणपती काळ्या मातीपासून आणि थेट रथावरच तयार केला जातो. तेही कोणत्याही साच्याशिवाय!

वैष्णवी कारंजकर

गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला हे तर आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. स्वातंत्र्य चळवळीच्या काळापासून या गणेशोत्सवाला सुरुवात झाली, लोक एकत्र येऊ लागले. पण तुम्हाला माहित आहे का? लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वीच महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये गणपतीची परंपरा सुरू झाली होती.

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वीच नंदुरबारमध्ये मानाचे दोन गणपती बसवण्याची परंपरा आहे. हे दोन्ही गणपती जवळपास १३९ वर्षे जुने आहेत. श्रीमंत दादा आणि श्रीमंत बाबा गणपती अशी या दोघांची नावे आहेत. एवढंच नव्हे तर या भागात मानाचे भाऊ, तात्या, काका, असेही गणपती बसवले जातात.

श्रीमंत दादा गणपतीची स्थापना सन १८८२ ला करण्यात आली. त्यानंतर एका वर्षाने १८८३ मध्ये श्रीमंत बाबा गणपतीची स्थापना करण्यात आली. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव १८९३ मध्ये सुरू केला. त्याच्या ११ वर्षे आधीच हे दोन गणपती नंदुरबारमध्ये स्थापन कऱण्यात आले होते.

या दोन्ही गणपतींचं वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही गणपतींची मूर्ती रथावरच तयार केली हाते. या दोन्ही मूर्ती काळ्या मातीपासून तयार केल्या जातात. गणेशोत्सवाच्या आधी रथावर काळी माती टाकून मंडळाचे कार्यकर्ते कोणत्याही साच्याशिवाय या मातीला आकार देतात. दरवर्षी हा आकार सारखाच असते, हे या गणपतींचं आणखी एक वैशिष्ट्य. गणपतीला आकार दिल्यानंतर या गणपतीला आकर्षक रंग दिले जातात. त्यानंतर त्यांच्यावर आभूषणे चढवली जातात.

नवसाला पावणारे अशी या दोन्ही गणपतींची ओळख आहे. त्यामुळे दरवर्षी श्रीमंत दादा आणि श्रीमंत बाबा गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. या गणपतींचं आणखी एक आकर्षण म्हणजे हरिहर भेट. ही परंपराही दोन्ही गणपतींच्या स्थापनेपासून कायम आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी दोन्ही गणपतींची मिरवणूक निघते.

दोन्ही गणपतीच्या मिरवणुका जळका बाजार चौकामध्ये एकत्र येतात. रात्री ९ च्या सुमारास दोन्ही गणपती समोरासमोर येतात. यावेळी गुलाल उधळला जातो. जल्लोष केला जातो. दोन्ही गणपतींची आरती होते आणि त्यानंतर मिरवणुका पुढे निघून जातात.

विसर्जन मिरवणुकांमध्येही सर्वात पुढे दादा गणपती त्यानंतर बाबा गणपती आणि त्यानंतर इतर मानाचे गणपती असा क्रम असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT