Kaju Modak Recipe: Sakal
ganesh food recipe

Kaju Modak Recipe: गणपती बाप्पासाठी झटपट १० मिनिटात बनवा स्वादिष्ट काजू मोदक, पाहा रेसिपी व्हिडिओ

Ganesh Chaturthi Special Recipe: लंबोदराला मोदक खुप प्रिय आहे. तुम्ही गणेशोत्सवा दरम्यान बाप्पाला काजूचे मोदक अर्पण करू शकता.

पुजा बोनकिले

Kaju Modak Recipe: देशभरात गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. यंदा गणेश चतुर्थी ७ सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे. गणेशोत्सवाला अवघे चार दिवस राहिले असून गणेशभक्त गणरायाची आतुरतेने वाट पाहत आहे.

अनेक ठिकाणी ढोल-ताशाच्या गजरात गणेशोत्सवाच्या तयारीला लागले आहेत. बाजारात विविध गणेश मूर्ती, मिठाई, सजावटीचे सामानाने सजली आहे. गणेश चतुर्थीला अनेक घरांमध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जाते. दहा दिवस चालणाऱ्या गणपती उत्सवात गणरायाला रोज वेगवेगळे नैवेद्य दाखवले जाते.

लंबोदराला मोदक खुप प्रिय आहे. यंदा गणरायाला काजू मोदकाचा नैवेद्य अर्पण करू शकता. काजू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. काजूमध्ये अँटिऑक्सिडंट, व्हिटॅमिन ई, खनिजे यासारखे अनेक पोषक घटक असतात. तसेच काजू खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

काजू मोदक बनवणे सोपे असून चवदार देखील आहे. तुम्ही कमी वेळेत हे मोदक तयार करू शकता. याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. काजू मोदक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत काय आहे जाणून घेऊया.

काजू मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

काजू- १ वाटी

पीठी साखर- गरजेनुसार

गरम पाणी

केशर - सजावटीसाठी

काजू मोदक बनवण्याची पद्धत

काजूचे मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी काजू मिक्सरमध्ये बारिक करून घ्यावे.

यानंतर मिक्सरमध्ये बारिक केलेली काजू पावडर चाळणीने एका प्लेटमध्ये गाळून घ्या.

नंतर त्यात पीठी साखर मिक्स करा.

नंतर त्यात पाणी मिक्स करावे आणि चांगले घट्ट मळून घ्यावे.

नंतर मोदकाच्या साच्याचा वापर करत काजुचे सारण भरावे आणि मोदक तयार करून घ्यावे.

नंतर एका प्लेटमध्ये काढून केशर लावून सजवावे आणि तयार काजू मोदक बाप्पांला अर्पण करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT