Ganesha Chaturthi 2024  esakal
ganesh food recipe

Ganesha Chaturthi 2024 : गौराईचा पारंपरिक मानाचा नैवेद्य कोणता, तुम्हाला माहितीय का?

Ganesha Chaturthi : भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात

सकाळ डिजिटल टीम

 Ganesha Chaturthi 2024 :

गणेशानंतर येणाऱ्या गौरी अवाहनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गौरीपूजन वा महालक्ष्मी पूजन हे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे. गौरीपूजन हा महाराष्टातल्या सणांपैकी एक सणही आहे. गौरीपूजनाला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. 

गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात. (Tradiotional Naivedya for Gauri Avahan)

ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. या तीन दिवसात गौरीला वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो. त्याबद्दलच जाणून घेऊयात.

पहिला दिवस भाजी भाकरी,वडी,दही भात

गौरी अवाहन म्हणजे गौरींचे घरी आगमणाचा दिवस होय. गौरीला पहिल्या दिवशी साधा पण तितकाच चविष्ट नैवेद्य दाखवतात. गौरीला आजच्या दिवशी भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवतात. भाद्रपदाच्या या महिन्यात शेपूची भाजी सर्वत्र उगवलेली असते. आपल्या आहारशास्त्रातही प्रत्येक ऋतूत येणारी भाजी खावी असे सांगितलेले आहे. आज गौरीसाठी ज्वारी किंवा बाजरीची भाकरी, शेपू अन् भोपळीच्या पानांची भाजी, आळूची किंवा पाटवडीचा बेत करतात.

दुसरा दिवस - गोडाधोडाचा नैवेद्य

गौरीच्या दुसऱ्या दिवशी तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. गौराईला पुरण पोळी,पापड,कटाची आमटी, भात, बटाट्याची भाजी असा नैवेद्य दाखवला जातो.

दही भात किंवा गोड शेवया

माहेरवाशीन असलेली गौराई तिसऱ्या दिवशी जाते. जाताना ती सोबत सौभाग्य अन् मुलाबाळांना आशिर्वाद देऊन जाते. पुढील वर्षी लवकर या असा निरोप घरगुती गणपती बाप्पांना देऊन सोबत गौरींची पाठवणी केली जाते. गौराईला या दिवशी दही-भात अन् गोड शेवय्या किंवा शिऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Rafael Nadal: 'राफा, तू टेनिसमधून ग्रॅज्युएट होतोय, मी अधिक इमोशनल होण्याआधी...', फेडररचं निवृत्त होणाऱ्या नदालला भावनिक पत्र

Latest Marathi News Updates : नागपूर येथील मॅक्स सुपर हॉस्पिटल मधून थोड्याच वेळात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे यांना उपचारानंतर थोडा वेळात रुग्णालयातून सुट्टी होईल...

Health Tips For Men: पुरूषांनी स्वत:ला लावून घ्याव्यात या दहा सवयी, तरच रहाल फिट अन् फाईन

SCROLL FOR NEXT