Modak  Esakal
ganesh food recipe

Ganeshotsav 2022: ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करून घरच्या घरी तयार करा परफेक्ट मोदक

10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणपती बाप्पाला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. गणपती बाप्पाला अर्पण केल्या जाणाऱ्या सर्व नेवैद्यपैकी मोदक हे सर्वात प्रिय आहेत

दिपाली सुसर

या वर्षी 31 ऑगस्टला गणपती बाप्पा आपल्या घराघरात विराजमान होणार आहेत. गणपती बाप्पांच्या होणाऱ्या आगमनामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत आहे. यावेळी गणेशभक्त पूजेपासून ते सजावटीपर्यंत विशेष काळजी घेताना दिसत आहेत. यासोबतच गणपतीला नैवेद्य दाखवणेही खूप महत्त्वाचे आहे. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणपती बाप्पाला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. गणपती बाप्पाला अर्पण केल्या जाणाऱ्या सर्व नेवैद्यपैकी मोदक हे सर्वात प्रिय आहेत. त्यामुळे गणपतीला मोदकांचा नैवेद्य आवर्जून अर्पण केला जातो. मात्र, अनेकजण घरी मोदक नीट बनवले जात नसल्याची तक्रार करतात. तर आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्सबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही घरच्याघरी परफेक्ट मोदक बनवू शकता.

मोदक करतांना गूळ आणि नारळ चांगले शिजवावे.

नारळ आणि गूळ एकत्र शिजवताना ते योग्य प्रकारे शिजवणे गरजेचं आहे. यासाठी त्यांना एकत्र शिजवताना सर्व अतिरिक्त ओलावा निघून ते कोरडे होईपर्यंत ते शिजवा. तसंच, आपण ते जास्त शिजवू नये याची देखील विशेष काळजी घ्यावी.

मोदक करण्यासाठी ताजे नारळ वापरावे.

मोदक करताना नेहमी ताजे नारळ वापरा. अनेकवेळा उशीर होऊ नये म्हणून आपण नारळ निवडताना दुर्लक्ष करतो. तर असे न करता नारळ निवडीकडे विशेष लक्ष द्या. ताजे नारळ वापरल्यास मोदकाला येणारी चव देखील वेगळी असते. तसंच मोदक खमंग देखील बनतात.

मोदकांचे पीठ योग्य पद्धतीने मळून घ्यावे.

मोदकासाठी पीठ व्यवस्थित मळून घेणे आवश्यक आहे.यासाठी साधारणतः 1 कप तांदळाचे पीठ मळण्यासाठी 1 कप पेक्षा थोडे जास्त पाणी लागते. जर तुम्ही पाणी घेताना योग्य प्रमाण ठेवले तर तुम्ही बनवलेले मोदक मऊ आणि चविष्ट होतात. त्याच वेळी, पीठ तडतडणार नाही आणि चिकट नाही याची खात्री करण्यासाठी, यासाठी थोडे कोमट पाणी शिंपडा आणि ते पुन्हा मळून घ्या. पीठ नीट मळून घेतल्यास मोदक मऊ आणि तडतडणार नाहीत.

हाताला तेलपाणी लावून मोदक करावेत

हाताने मोदक बनवताना, एका भांड्यात बोटे बुडवून घ्या आणि नंतर पिठाचा एक भाग घ्या जो चेंडूच्या आकारात असेल. दोन्ही हातांच्या अंगठ्याच्या आणि तर्जनीच्या साहाय्याने गोलाकार गतीने पसरून मोदक बनवण्यास सुरुवात करा. दुसरीकडे, जर पीठ चिकट असेल तर पाण्याऐवजी तूप देखील वापरू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT