Ganeshotsav 2022 Recipe 
ganesh food recipe

Ganeshotsav 2022 Recipe: गणपती बाप्पाच्या प्रसादाला तळलेले मोदक कसे तयार करायचे?

गणेशोत्सव 31 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव प्रमाणेच घरोघरी बाप्पाचे आगमन होते.

दिपाली सुसर

गणेशोत्सवात गणपती बाप्पाला मोदकांचा प्रसाद दाखवताना मुलांच्या आवडीचा देखील विचार करा आणि ट्राय करा तळलेले मोदक.

गणेशोत्सव 31 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव प्रमाणेच घरोघरी बाप्पाचे आगमन होते. काही लोकांकडे दहा दिवसांचा उत्सव असतो तर काही लोकांकडे पाच किंवा दीड दिवसाचा उत्सव असतो.

उत्सव कितीही दिवसांचा असला तरी बाप्पाला प्रिय असणाऱ्या मोदकांच्या प्रसादाशिवाय तो पूर्ण होत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवताना त्यात खास तळलेले मोदक तुम्ही बनवून पहा. चला तर मग जाणून घेऊ या कसे बनवायचे तळलेले मोदक

साहित्य:

● 200 ग्रॅम मैदा

● 200 ग्रॅम खोबरं किस

● 200 ग्रॅम पिठी साखर

● 1 लहान चमचा वेलची पावडर

● ड्राय फ्रूट्स स्वादानुसार

● 2 चमचे तेल मोहनसाठीतळण्यासाठी शुद्ध तूप


कृती:

मैद्यात मोहन घालून पाण्याने पीठ घट्ट मळून घ्या. खोबरं किस ,पिठी साखर , वेलची पावडर, ड्राय फ्रूट्स मिसळून घ्या. मैद्याच्या लहान-लहान लाट्या करा.

लहान पुर्‍या लाटा.

त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्या.फ्राइंग पॅनमध्ये तूप गरम करा. मोदक हलके सोनेरी होयपर्यंत तळून घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT