लाकडी गणपती (फोटो : विश्वजित पवार)
चंदनाच्या खोडात कोरलेली श्रींची एकमेव मूर्ती: चंदन हा भारतीय वृक्षाचा महत्त्व असल्याने या मंडळाचा गणपती महत्त्वपूर्ण ठरतो. पेशवे कालीन सरदार मराठे यांनी चंदनाच्या अखंड खोडातून कोरीव नक्षीकाम करून ही मूर्ती बनून घेतली.मूर्तीचे उंची २१ इंच असून सौवा किलोच्या आसपास आहे आजही या मूर्ती ला चंदनाच्या सैवास येतो.गेले ८८ वर्ष या मूर्तीची स्थापना करीत गणेशोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येत आहे. (फोटो : विश्वजित पवार)लाकडी गणपती सावर्जनिक गणेशोत्सव मंडळ :
ऋध्दी -सिध्दीसह चौंरगावर विराजमान झालेलली ही बरमाटी लाकडापासून बनवलेली गजाननांची एक सुरेख व रेखीव मुर्ती आहे. सव्वासाह फुट उंच महाराष्टातील पहिली लाकडी मुर्ती आहे. (फोटो : विश्वजित पवार)पेशवेकालीन सारसबाग गणपती(तळ्यातला गणपती) :
पुण्यातील सारसबागेला पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. पहिल्या बाजीरावाचे चिरंजीव नानासाहेब पेशवे यांनी पर्वती पायथ्याला तळे खाेदून मध्यभागी बेटावर सारसबाग फुलवली. पर्वतीच्या पायथ्याशी सुमारे पंचवीस एकराचे तळे नानासाहेबांनी पाणी साठवण्यासाठी मुद्दाम खोदवून घेतले होते. नानासाहेबांचे नातू सवाई माधवराव यांनी 1784 मध्ये त्या बेटावर गणपतीचे मंदिर बांधले.
त्यात संगमरवरी श्रींची मूर्ती उजव्या सोंडेची असल्याने तिला सिद्धिविनायक म्हटले जाते. (फोटो : विश्वजित पवार)विहीर खांदतांना सापडलेली दशभुज चिंतामणी मूर्ती
: १८८६ विहीर खोदकाम चालू असताना ९ ऑक्टोबर १९६४ रोजी सकाळी ११ चा सुमाऱ्यास ९ फूट खोली वर चिंतामणीची मूर्ती सापडली व कुटुंबांनी मूर्तीची तात्पुरता स्थापना एक लहानशी घुमटी बांधून केली. (फोटो : विश्वजित पवार)गुंडाचा गणपतीचे पेशवेकालीन देऊळ:
पुणे शहरातील कसबा पेठेत शिंपी आळीच्या शेवटाला गुंडाचा गणपती नावाचे पेशवेकालीन देऊळ आहे.पेशवाईतील मुत्सद्दी नाना फडणीस आंचा नागोजी गुंड नावाचा सहकारी होता. 'त्याच्या घराजवळील गणपती' असा जो दुसरे बाजीराव पेशवे यांच्या १८१०-११ सालामधील रोजनिशीमध्ये उल्लेख आहे, तोच गणपती आज "गुंडाचा गणपती' म्हणून प्रसिद्ध आहे. (फोटो : विश्वजित पवार)बढाई बांधवांचा गणेशोत्सवः रविवार पेठ शनिवारवाड्याचे बांधकाम बढाई बांधवांनी केले. लोकमान्य टिळकांनी काही विशिष्ट समाजाला गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. त्यातील बढाई समाजातील एकत्र येऊन पुणे बढाई समाज ट्रस्ट स्थापित केले. सन १८९३ मध्ये घोडेपिर बसवन्याच्या ठिकाणी बढाई समाजाच्या पहिल्या गणेश मूर्तीची स्थापना केली.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.