कुरुंदा (जि.हिंगोली) : येथील टोकाईगडावर सह्याद्री देवराईतर्फे या वर्षी पर्यावरणपूरक 'गोमय गणेशाची' प्रतिष्ठापना अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन गोमय गणेशाची मूर्ती त्यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
कुरुंदा (जि.हिंगोली) : येथील टोकाईगडावर सह्याद्री देवराईतर्फे या वर्षी पर्यावरणपूरक 'गोमय गणेशाची' प्रतिष्ठापना अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन गोमय गणेशाची मूर्ती त्यांच्याकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान ही मूर्ती गोमातेचे शेण, डिंक व रंगासाठी वापरली जाणारी काव फक्त पर्यावरणातील साहित्य वापरून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे हा संपूर्ण 'पर्यावरणपूरक गणेश' आहे. पर्यावरणाची जपणूक व्हावी. यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. पण सह्याद्री देवराई टोकाईगड परिवाराने गोमय गणेशा सोबतच वृक्षालाच गणेशाचे रुप देत वृक्ष गणेशा च्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाचा अनोखा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
सह्याद्री देवराई टोकाईगड परिवार गडाच्या आणि पर्यायाने संपूर्ण पर्यावरणाच्या विकासाठी नेहमी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. या वर्षी श्री गणेश उत्सवानिमित्त नैसर्गिक आकार असणाऱ्या गडावरील कळंब झाडाच्या खोडावर दगड, नारळ, रंग आणि नारळाच्या जटांचा वापर करून पर्यावरणापूरक असणारी गणेश मुर्ती साकारली आहे. जिल्ह्यातील वरुड चक्रपाणी(ता. सेनगाव) येथील वृक्षप्रेमी मित्र शरद आदमाने यांनी सह्याद्री देवराई टोकाईगड परिवाराची श्री गणेश उत्सव पर्यावरणपुरक साजरा करत वसुधंरेचे रक्षण करण्याची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून वृक्ष गणेशाची मूर्ती साकारली आहे.या परिवाराने आमचा देव दगडात नाही, आमचा देव देवळात नाही तर आमचा देव झाडात आहे. वर्षांनुवर्षे अन् पिढ्यानपिढ्या तुम्हाला-आम्हाला आपणा सर्वांना प्राणवायू देणारं केवळ झाडंच आहे. ज्याच्या वाचून कुणीही क्षणभरही जगू शकत नाही तो आँक्सिजन वायू म्हणजे आपलं जिवन आहे. असा संदेश दिला आहे. आजपर्यंत आपण बाप्पाचं आणि निसर्गाचं नातं विसरलो होतो. टाकाऊ वृक्ष खोडापासून बनणारे किंवा झाडाच्या नैसर्गिक आकाराच्या खोडाचा किंवा इतर पर्यावरण पुरक असणारा गणपती सोडून, प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती बनवत होतो, सजावटी साठी प्लास्टिकचा अतोनात वापर करत होतो. या सर्व प्रकाराला बाजूला सारण्याचीही गरज निर्माण झाली होती.त्यामुळे आता पर्यावरणाच्या आणि पर्यायाने मानव जातीच्या हिताच्या बाजूने जात गणेश विसर्जनामुळे होणारा जलप्रदूषणचा धोका कमी करत वृक्षरुपी एक गणेश देवराई वाढवत आहोत आणि त्याच माध्यमातून झाडं, फळं आणि फुलांचा ऊत्सव म्हणून निसर्गाची पुजा करणारा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. तसेच येथे दर्शनाला येतांना परिसरातील वृक्षप्रेमी बांधव, भाविक भक्तांनी प्रसादाऐवजी प्रसाद म्हणून झाडचं आणावीत, असे आवाहन सह्याद्री देवराईतर्फे केले आहे. हा आगळा-वेगळा गणपती पाहण्यासाठी येथे गर्दी होत आहे.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.