PM Modi in US Congress eSakal
ग्लोबल

PM Modi in US : अमेरिकेच्या संसदेत पंतप्रधानांनी केलं भाषण; १५ वेळा उभे राहिले खासदार, ७९ वेळा वाजल्या टाळ्या

संयुक्त सत्रातील भाषणानंतर अमेरिकी काँग्रेसमधील कित्येक सदस्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

Sudesh

पंतप्रधान मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अमेरिकेतील संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी रशिया-युक्रेन युद्ध, दहशतवाद, अमेरिका आणि मुंबईमधील दहशतवादी हल्ले अशा विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी अमेरिकेच्या खासदारांनी तब्बल ७९ वेळा टाळ्या वाजवून मोदींना प्रतिसाद दिला.

पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी कमीत कमी १५ वेळा अमेरिकेतील खासदारांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. तर, मोदींच्या एकूण भाषणादरम्यान एकूण ७९ वेळा टाळ्या वाजल्या. पंतप्रधान मोदींचे भाषण संपल्यानंतरही बराच वेळ अमेरिकेतील खासदार उभं राहून टाळ्या वाजवत होते.

सेल्फीसाठी झाली गर्दी

संयुक्त सत्रातील भाषणानंतर अमेरिकी काँग्रेसमधील कित्येक सदस्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. तसंच त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी, आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठीही गर्दी झाली होती. यावेळी पंतप्रधान मोदींनी प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष केविन मॅक्कार्थी यांच्या संयुक्त सत्र संबोधन पुस्तिकेवर देखील सही केली.

काय म्हणाले मोदी

पंतप्रधान मोदी सुमारे तासभर या सभेला संबोधित करत होते. आपल्या भाषणात त्यांनी दहशतवाद आणि कट्टरपंथ जगासाठी मोठा धोका बनत चालल्याचा उल्लेख केला. अमेरिका जगातील सर्वात जुनी लोकशाही आहे, तर भारत सगळ्यात मोठी. त्यामुळे या दोन्ही देशांची भागिदारी लोकशाहीच्या भविष्यासाठी अगदी चांगली बाब असल्याचं मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पाकिस्तानलाही नाव न घेता चांगलंच सुनावलं.

पंतप्रधानांचं भाषण उत्साहवर्धक

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी रशिया आणि युक्रेन युद्धाबाबतही भाष्य केलं. रक्तपात थांबवून, युद्धावर चर्चेतून तोडगा काढण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. पंतप्रधानांचं हे भाषण अगदी उत्साहवर्धक असल्याचं मत अमेरिकेतील काँग्रेस सदस्य डॅन म्यूजर यांनी व्यक्त केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil: कोल्हापुरातील नाराजी नाट्यानंतर सतेज पाटील यांना अश्रू अनावर! कार्यकर्त्यांशी बोलताना भावूक

Pune Vidhan Sabha: पुणे जिल्ह्यातील विधानसभेसाठी फायनल झालेले उमेदवार; जाणून घ्या संपूर्ण यादी

Reliance Jio IPO: जिओ शेअर बाजारात धमाका करणार; भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO आणणार

Assembly Elections: बंडखोर इतिहास गिरवणार! महाराष्ट्रात यंदा विधानसभा १९९५ची पुनरावृत्ती होणार?

Raj Thackeray: फोडाफोडीच्या राजकारणाचे आद्यकर्ते शरदचंद्र पवार, बोचरी टीका करत राज ठाकरेंनी भूतकाळ गिरवला!

SCROLL FOR NEXT