जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी मिस्त्री जहूर इब्राहिम उर्फ जाहिद अखून ज्याने IC-814 फ्लाइट हायजॅक केली होती. याचा पाकिस्तानमध्ये नुकताच खून झाला. यावेळी त्याला डोक्यात दोनदा गोळ्या घालून ठार करण्यात आले. यामुळे पाकिस्तानचं गृहखातं आणि इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (आयएसआय) अत्यंत अस्वस्थ झाले आहेत. कारण आता भारताविरोधी दहशतवाद्यांच्या हत्यांची साखळी सुरू झाली आहे अस म्हटलं जात आहे.
महत्वाची बाब म्हणजे, या महिन्याच्या सुरुवातीला, कराचीमध्ये लष्कर-ए-तैयबाचा एक प्रमुख नेता मारला गेला होता. मारला गेलेला प्रमुख नेता हा 26/11 च्या हल्ल्यामागील सूत्रधार हाफिज सईदचा विश्वासू होता.
याच बरोबर नुकतीच अजून एक अशीच घटना घडली होती. ती म्हणजे, हाफिज सईदचा जवळचा सहकारी असणारा मुफ्ती कैसर फारूक याचा कराचीमध्ये खून करण्यात आला. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गोळ्या घालून मुफ्ती कैसर फारूकचा खून केला. त्याच्या हत्येमुळे दहशतवाद्यांना चांगलाच धक्का बसला होता. त्यातच आता जाहिद हाकुनचाही खून झाला.
तर दुसरीकडे खलिस्तानी दहशतवादी रिपुदमन सिंग मलिकचा 15 जुलै 2022 रोजी कॅनडामध्ये खून झाला. 23 एप्रिल 1985 रोजी एअर इंडियाच्या विमानात बॉम्बस्फोट झाला होता. याचा तो मुख्य आरोपी होता. या हल्ल्यामुळे 329 निरपराधांचा मृत्यू झाला होता.
पाकिस्तान-कॅनडा या देशांमध्ये १९ महिन्यांत अज्ञातांकडून भारतविरोधी १६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे गृहखाते आपले बोट भारताच्या गुप्तचर संस्थेकडे दाखवत आहेत. असे असले तरी हे हल्ले नक्की कोणी केले आणि स्थानिकांनी या हल्लेखोरांना साथ कशी दिली ? हा प्रश्नाचे उत्तर अजून मिळू शकले नाहीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.