23-year-old Indian girl student in US goes missing from California police Call for help marathi news  
ग्लोबल

Indian Student In US : अमेरिकेत भारतीय विद्यार्थिनी बेपत्ता! कॅलिफोर्निया पोलिसांकडून मदतीचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा


न्यूयॉर्क, ता. ३ (वृत्तसंस्था): अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांवर शेरेबाजी करणे, हल्ला करणे या घटना आता सामान्य होत आहेत. भारतीयांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. आता कॅलिफोर्नियातील २३ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. नितीशा कंडुला असे तिचे नाव असून ती २८ मेपासून बेपत्ता आहे. आतापर्यंत वर्षभरात सात भारतीयांचा विविध कारणाने मृत्यू झाला आहे. पोलिसांनी कंडुलाला शोधण्यासाठी नागरिकांची मदत मागितली आहे.

कॅलिफोर्निया राज्यातील स्टेट यूनिर्व्हर्सिटी सॅन बर्नाडिनो (सीएसयूएसबी)ची विद्यार्थिनी नितीशा कंडुला २८ मे पासून गायब आहे. ती मुळची हैदराबादची आहे. सीएसयूएसबीचे पोलिस प्रमुख जॉन गुटेरेज यांनी काल सोशल मीडियावर तिच्याबाबत काही माहिती शेअर केली आहे. शेवटचे ती लॉस एंजलिसमध्ये दिसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ती बेपत्ता असल्याची खबर ३० मे रोजी लागली. तिच्या शोधासाठी पोलिसांनी एक नंबर (९०९) ५३७-५१६५ जारी केला आहे.

एखाद्याला माहिती मिळाली तर या क्रमांकावर फोन करण्याची सूचना पोलिसांनी केली आहे. नितीशाची उंची पाच फुट सहा इंच असून वजन १६० पौंड असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कंडुला ही कॅलिफोर्नियात परवान्यासह २०२१ टोयाटो कोरोला चालवत होती. मोटारीचा रंग ठाऊक नाही, मात्र तिच्याविषयी काही माहिती असल्यास कॅलिफोर्निया पोलिसांना माहिती कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सहा महिन्यांत सात भारतीयांचा मृत्यू

यावर्षी २०२४ मध्ये अमेरिेकत सात भारतीय आणि एका भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. भारतीय विद्यार्थ्यावर सतत हल्ले होत आहेत. या कारणांमुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायात चिंतेचे वातावरण आहे.

जानेवारी २०२४: पर्ड्यू विद्यापीठाचे विद्यार्थी नील आचार्य बेपत्ता असल्याची बातमी आली. यानंतर नीलचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
जानेवारी २०२४: जानेवारी महिन्यात ओहायो येथे लिंडनर स्कूल ऑफ बिझनेसचे विद्यार्थी श्रेयस रेड्डी यांचा मृतदेह सापडला
फेब्रुवारी २०२४: भारतीय वंशाचे विद्यार्थी समीर कामथ यांचा मृतदेह इंडियाना भागात सापडला. समीर कामथ हे पडर्यू विद्यापीठाचे विद्यार्थी होते.
फेब्रुवारी २०२४: वॉशिंग्टन येथे एका रेस्टॉरंटच्याबाहेर भारतीय वंशाचे आयटी एक्झिक्युटिव्ह विवेक तनेजा याच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
फेव्रुवारी २०२४ : अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अकुल धवन असे त्याचे नाव होते आणि तो इलिनोईस विद्यापीठाच्या अर्बाना शॅम्पेन विद्यार्थी होता. १८ वर्षीय अकुल धवन याचा मृतदेह कॅम्पस बिल्डिंगच्या बाहेर आढळून आला. त्याचा मृत्यू हायपोथर्मियामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. कारण तो बराच वेळ गोठविणाऱ्या थंडीत होता.
मार्च २०२४: वॉशिंग्टन विद्यापीठाचा विद्यार्थी आणि कुचुपुडी कलाकार अमरनाथ घोष यांच्यावर सेंट लुईस येथे गोळी घालण्यात आली. पश्‍चिम बंगालचे रहिवासी अमरनाथ घोष हे २०२३ मध्ये अमेरिकेत गेले होते. गोळीबारात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मार्च २०२४: अभिजित पारुचुरू यांच्या मृत्यूची बातमी आली. त्यांच्यावर हल्ला झाल्याचे अद्याप स्पष्ट झाले नाही.

कोणत्या राज्यातील सर्वाधिक विद्यार्थी परदेशात (२०१९-२०२०)

भारतातील आंध्र प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र यासारखे श्रीमंत राज्यातील विद्यार्थी परदेशात शिकण्यासाठी उत्सुक असतात. परकी शिक्षणाच्या संभाव्य फायद्याबाबत ते सजग असतात.
आंध्र प्रदेश........१२ टक्के
पंजाब ..............१२ टक्के
महाराष्ट्र............११ टक्के
गुजरात ...........८ टक्के
तमिळनाडू............७ टक्के
कर्नाटक................५ टक्के
-----------
(स्रोत: एचबीएस रिक्रुटमेंट स्टॅट)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT