Nigeria Firing Esakal
ग्लोबल

Nigeria Firing: अमानुष! बंदुकधाऱ्यांच्या हल्ल्यात ४० लोक ठार; पीडित म्हणाले, त्यांनी आमची...

आशुतोष मसगौंडे

आफ्रिकन देश नायजेरियातील एका गावात बंदुकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोपींनी गावात अंदाधुंद गोळीबार केला. आरोपींनी अनेक घरांना आग लावल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेकांचे अपहरणही झाले. येथे शेतकरी आणि मेंढपाळ यांच्यात वारंवार हिंसाचार होत असतो. नायजेरियाच्या उत्तर-मध्य भागात असलेल्या राज्यात ही घटना घडली.

जुरक गावावर हल्ला करणाऱ्या या सशस्त्र हल्लेखोरांना स्थानिक भाषेत डाकू म्हणतात. पोलिसांचे प्रवक्ते आल्फ्रेड अलाबो यांनी सांगितले की, सुरक्षा दलाच्या आक्रमक हल्ल्यापासून पळून गेलेल्या सशस्त्र गटाने सोमवारी रात्री उशिरा अचानक जुराक गावात प्रवेश केला आणि गावांवर हल्ला केला.

चकमकीत, सुरक्षा दलाने सात हल्लेखोरांना ठार केले, तर पळून गेलेल्या टोळीतील सदस्यांनी नऊ जणांना ठार केले आणि सहा घरे जाळली.

मृतांचा आकडा जास्त असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यांनी रॉयटर्सला सांगितले की डझनभर बंदूकधारी मोटारसायकलवरून गावात घुसले, अंदाधुंद गोळीबार केला, लोकांचे अपहरण केले आणि अनेक घरांना त्यांनी आग लावली.

गावातील एका रहिवाशाने सांगितले की, "बंदूकधाऱ्यांनी कोणतीही दयामाया न ठेवता 40 हून अधिक लोकांची हत्या केली. मी कसातरी पळत पळत जवळच्या गावात पोहोचलो. आत्तापर्यंत मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना पाहिलेले नाही."

आणखी एक रहिवासी, टिमोथी हारुना यांनी रॉयटर्सला सांगितले की, "बंदुकधारींनी अनेकांना ठार केले आणि अनेकांचे अपहरण केले. इतर अनेक लोक गोळ्यांनी जखमी झाले. त्यांनी आमची घरेही पेटवली."

अलिकडच्या वर्षांत उत्तर नायजेरियामध्ये ग्रामीण भागात हल्ले आणि खंडणीसाठी अपहरण सामान्य झाले आहेत, जेथे सशस्त्र टोळ्यांनी गावे, शाळा आणि प्रवाशांना लक्ष्य केले आहे.

नायजेरिया सुरक्षा आव्हानांनी त्रस्त आहे, ज्यामध्ये त्याच्या ईशान्येतील 14 वर्षांचे इस्लामी बंड, दक्षिण-पूर्वेतील फुटीरतावादी हिंसाचार आणि शेतकरी व पशुपालकांमध्ये वारंवार होणारे प्राणघातक संघर्ष यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT