एकेकाळी ट्विटर डीलपासून दूर जाण्याचा प्रयत्न करणारा एलाॅन मस्क आता उघडपणे ट्विटरवर आपला हक्क गाजवत आहे.
Elon Musk Twitter Deal : एकेकाळी ट्विटर डीलपासून दूर जाण्याचा प्रयत्न करणारा एलाॅन मस्क (Tesla CEO Elon Musk) आता उघडपणे ट्विटरवर आपला हक्क गाजवताना दिसत आहे. कालच ट्विटरच्या कार्यालयात जावून मस्कनं आपण मोठे बदल करणार असल्याचे संकेत दिले होते. यानंतर ट्विटरच्या अधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरु झालंय.
टेस्लाचे सीईओ एलाॅन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर आता ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल (Parag Agarwal) आणि सीएफओ नेड सेहगल यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यासोबतच मस्कनं ट्विटरच्या कायदेशीर पॉलिसी हेडमधूनही त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या खात्यावर बंदी घालणारेही हेच आहेत.
या महिन्याच्या 4 ऑक्टोबर रोजी मस्कनं $44 अब्ज डॉलरचा हा करार पूर्ण करण्याचे संकेत दिले होते. गेल्या काही महिन्यांपासून तो या करारातून सुटका करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, ट्विटरनं मस्कला कोर्टात खेचल्यानंतर मस्कनं हा करार पूर्ण करण्याची ग्वाही दिली. या संपूर्ण घटनेत नेमकं काय घडलं, ते जाणून घेऊ..
31 जानेवारी : मस्कनं हळूहळू ट्विटरमध्ये आपली हिस्सेदारी वाढवण्यास सुरुवात केली. मार्चपर्यंत मस्कची ट्विटरमध्ये 5 टक्के भागीदारी होती.
26 मार्च : मस्कनं पहिल्यांदा ट्विटर विकत घेण्याचे संकेत दिले. ट्विटच्या माध्यमातून मस्कनं ट्विटरवर प्रश्न उपस्थित केले. यासोबतच मस्क यांनी ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांची भेट घेतली.
27 मार्च : मस्कनं ट्विटरच्या सीईओ आणि बोर्डाची भेट घेतली. यावेळी त्यांनी बोर्डमध्ये आपल्या समावेशाबाबत चर्चा केली.
4 एप्रिल : ट्विटरनं सांगितलं की, 9 टक्के स्टेक विकत घेऊन मस्क ट्विटरचा सर्वात मोठा शेअरहोल्डर बनला आहे. त्यांच्याकडं $3 अब्ज किमतीचे 7.35 कोटी शेअर्स आहेत.
5 एप्रिल : मस्कनं ट्विटरच्या बोर्डवर अटींसह काही मागण्या केल्या.
9 एप्रिल : मस्क आणि सीईओ अग्रवाल यांच्या मैत्रीत पहिल्यांदाच तणाव निर्माण झाला. दोघांनी एकमेकांना ट्विटद्वारे प्रश्न विचारायला सुरुवात केली.
11 एप्रिल : ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी जाहीर केलं की, मस्क ट्विटर बोर्डमध्ये सामील होणार नाहीत.
14 एप्रिल : मस्कनं ट्विटर विकत घेण्यासाठी 44 अब्ज डॉलरची ऑफर दिली.
15 एप्रिल : ट्विटरनं मस्क यांना संरक्षणात्मक धोरण सांगितलं.
21 एप्रिल : मस्कनं करारासाठी $46 अब्ज जमा केले.
25 एप्रिल : मस्कनं ट्विटरला $44 बिलियनमध्ये खरेदी करण्याचा करार केला.
एप्रिल 29 : मस्कनं करारासाठी निधी देण्यासाठी टेस्लाचे $8.5 अब्ज किमतीचे शेअर्स विकले.
6 जून : मस्कनं ट्विटरशी करार तोडण्याची धमकी दिली.
12 जुलै : डीलमधून माघार घेण्यासाठी ट्विटरनं मस्कविरोधात कोर्टात दाद मागितली, मस्कही ट्विटरविरोधात कोर्टात पोहोचले.
19 जुलै : कोर्टानं सांगितलं की, या प्रकरणाची सुनावणी ऑक्टोबरपासून सुरू होईल.
5 ऑक्टोबर : मस्कनं जाहीर केलं की, ट्विटरबाबत पहिल्या प्रस्तावासह आम्ही पुढं जात आहोत आणि लवकरच करार पूर्ण करेल.
6 ऑक्टोबर : न्यायालयानं 17 ऑक्टोबर रोजी सुनावणी पुढं ढकलली आणि दोन्ही बाजूंना करारावर पोहोचण्यास आणि 28 ऑक्टोबरपर्यंत करार पूर्ण करण्यास सांगितलं.
26 ऑक्टोबर : मस्कनं एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात तो ट्विटर मुख्यालयात प्रवेश करताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.