China Boy viral Video eSakal
ग्लोबल

धक्कादायक! आई काठी घेऊन लागली मागे, मार चुकवण्यासाठी ६ वर्षाच्या मुलाची पाचव्या मजल्यावरून उडी

चीनमधील सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Sudesh

चीनच्या अनहुई प्रांतातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका सहा वर्षांच्या मुलाने आईच्या मारापासून वाचण्यासाठी चक्क पाचव्या मजल्यावरून उडी मारली. चीनमधील सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. लोकांनी देशातील बाल संरक्षण कायद्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ जून रोजी घडली होती. आई ओरडत असल्यामुळे एक मुलगा आपल्या घराच्या खिडकीमधील एसी युनिटवर जाऊन उभारला होता. पाचव्या मजल्यावर राहत असलेला हा मुलगा बाहेर उभा पाहून खाली असलेले लोक त्याला ओरडून आत जाण्यास सांगत होते.

यावेळी अचानक त्याची आई खिडकीत आली. तिच्या हातात एक काठी देखील होती. या काठीने ती त्याला मारण्याचा प्रयत्न करत होती. हे पाहून घाबरलेल्या त्या मुलाने तिथून थेट खाली उडी मारली. खाली असलेले लोक यावेळी आईलाही ओरडून मुलाला मारू नको म्हणून सांगत होते. मात्र, अचानक मुलाने खाली उडी मारल्यामुळे एकच गोंधळ उडाला.

आत येण्यासाठीच ओरडत होती आई

पोलिसांनी यानंतर वीबो या सोशल मीडिया साईटवर माहिती दिली. ही आई आपल्या मुलाला मारत नव्हती, तर आत येण्यासाठी सांगत होती. ती काठी देखील केवळ त्याला भीती दाखवण्यासाठी होती असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान, हा मुलगा जिवंत असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आईच्या मारापेक्षा उडी परवडली

मात्र प्रत्यक्षदर्शींनी असं म्हटलं आहे, की ही आई आपल्या मुलाला मारतच होती. त्यांनी मनाई केल्यानंतरही ती मुलाला मारत राहिली. या मुलाला आईची एवढी भीती बसली होती, की त्या तुलनेत त्याला खाली उडी मारणं हा चांगला पर्याय वाटला; असं काही नेटीझन्सनी म्हटलं आहे. चीनमधील सोशल मीडिया साईटवर या घटनेच्या व्हिडिओला १० मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT