Boat Capsizes in Congo ESakal
ग्लोबल

Boat Capsizes: प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटली,78 जणांचा दुर्दैवी मृत्यू, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vrushal Karmarkar

Boat Capsizes in Congo: मध्य आफ्रिकन देश काँगोमधील किवू सरोवरात गुरुवारी एक बोट उलटून 78 जणांचा मृत्यू झाला आहे. बोटीत 278 लोक होते. यात किमान 78 लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. देशाच्या पूर्वेकडील कितुकू बंदरापासून काही मीटर अंतरावर ही बोट बुडाली. बोट आपल्या बंदरावर पोहोचणार होती. परंतु ती आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यापूर्वी काहीशे मीटरवर बुडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात सापडलेली बोट दक्षिण किवू प्रांतातील मिनोवा येथून उत्तर किवू प्रांतातील गोमाकडे जात होती. गोमाच्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर बोटीचा अपघात होऊन ती बुडाली. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये बोट आधी एका बाजूला झुकते आणि नंतर बुडते.

यापूर्वी जूनमध्ये काँगोची राजधानी किन्शासाजवळ बोट बुडाल्याने 80 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. जानेवारी महिन्यात माई-नडोम्बे तलावात बोट उलटून 22 जणांचा मृत्यू झाला होता. कांगोमध्ये अशा घटना सामान्य आहेत. येथे बोट क्षमतेपेक्षा जास्त लोक आणि सामानाने भरलेली असते. त्याचबरोबर प्रवाशांना लाईफ जॅकेटही दिले जात नाही. अशा स्थितीत लाट उसळल्यावर बोट उलटते. यानंतर बचावकार्य कठीण होते.

या अपघातातही असेच घडले. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त सामान होते. सुरुवातीला पाणी शांत होते, पण नंतर लाटा उसळू लागल्या आणि बोट बुडाली. या अपघातातून बचावलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, सुरुवातीला सर्व काही शांत होते, नंतर लाटा उसळू लागल्या आणि बोट झुकली. अशा स्थितीत वर बसलेल्या लोकांनी पाण्यात उड्या मारायला सुरुवात केली आणि हळूहळू संपूर्ण बोट बुडाली. मृतांची नेमकी संख्या जाणून घेण्यासाठी किमान तीन दिवस लागू शकतात, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mangesh Kulkarni: वादळवाट, आभाळमाया या प्रसिद्ध मालिकांचे गीतकार लेखक मंगेश कुलकर्णी यांचं निधन

"बियर्डलेस बॉयफ्रेंड की तमन्ना अब हमारे दिल में है"; खोटी दाढी लावून तरुणींची जोरदार घोषणाबाजी, आंदोलनाचा Video Viral

Nana Patole: शिर्डी विधानसभेच्या लोणी गावात 2,844 बोगस मतदार; पटोलेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

VIDEO : "...तर लॉरेन्स बिश्नोई आमचा हिरो!"; जैन मुनींचा वादग्रस्त व्हिडीओ तुफान व्हायरल

Savner Vidhan Sabha: सावनेर यंदा केदारांकडं राहणार की जाणार? कसं आहे सध्याचं समिकरण?

SCROLL FOR NEXT