Canada 
ग्लोबल

Canada: दिवाळी साजरे करणाऱ्या हिंदूंवर खलिस्तानी समर्थकांची दगडफेक? सोशल मीडियावरील व्हिडिओत दावा

दिवाळी साजरा करणाऱ्या हिंदू समूदायावर काही खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- दिवाळीचा उत्सव सुरु असल्याने देशभरात आनंदाचे वातावरण आहे. भारतीय आपापल्या परीने दिवाळी साजरा करत आहेत. जगभरातील हिंदू देखील दिवाळीचा उत्सव साजरा करत असतात. त्यातच कॅनडामधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. दिवाळी साजरा करणाऱ्या हिंदू समूदायावर काही खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (A purported video of a mob of Khalistan supporters clashing with a Hindu crowd during a Diwali celebration in Canada Brampton has gone viral on social media)

व्हिडिओमध्ये काही जण खलिस्तानी झेंडा बाळगत असून दिवाळी साजरा करणाऱ्या हिंदू समूदायावर ते दगडफेक करत असल्याचा दावा करण्यात आलाय. इंडिया टूडेने टोरोंटो सनच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. एका सोशल मीडिया युझरने हा व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. ही घटना मेल्टनमधील वेस्टवूड मॉल येथे घडल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये काही वेळाने पोलिस येऊन जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय.

याप्रकरणी पील स्थानिक पोलिस तपास करत असल्याचं टोरोंटो सनने सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी भारत सरकारने कॅनडामध्ये होत असलेल्या हिंदूंवरील हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच हिंसा, हल्ला आणि प्रार्थना स्थळांना लक्ष्य करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी फ्रेमवर्क तयार करण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज तणाव वाढवणारी घटना घडली आहे.

जगभरातील हिंदू दिवाळी उत्सव सादरा करतात. दोन दिवसापूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हिंदू आणि शीख समूदायासोबत दिवाळी साजरा केली होती. सदरची घटना खरी असल्यास भारत आणि कॅनडामधील संबंधात आणखी तणाव निर्माण होणार आहे. खलिस्तानी समर्थक निज्जर याच्या हत्येमागे भारतीय गुप्तचर यंत्रणा असल्याचा दावा कॅनडाने केला होता. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT