Julian Assange Sakal
ग्लोबल

विकिलिक्सच्या संस्थापकाला भोगावा लागणार 175 वर्षांचा तुरुंगवास?

असांजेच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिका गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहे.

सकाळ डिजिटल टीम

लंडन : विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांजेला (WikiLeaks Founder Julian Assange) अमेरिकेच्या स्वाधीन केले जाऊ शकते. ब्रिटनच्या एका न्यायालयाने असांजे यांना इराक आणि अफगाणिस्तान युद्धांशी संबंधित गुप्त फाईल्स प्रकाशित केल्याबद्दल दोषी ठरवत असांजे यांना अमेरिकेला प्रत्यार्पण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, जिथे असांजेला थोडा थोडका नव्हे तर, तब्बल 175 वर्षे तुरुंगवास भोगावा लागू शकतो. (UK Judge Ordered Extradition Of Julian Assange To US)

दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध अपील करण्यासाठी बचाव पक्षाला 18 मेपर्यंत मुदत आहे. दरम्यान, ब्रिटनच्या गृहसचिव प्रिती पटेल याही या निर्णयावर अंतिम निर्णय देण्यापूर्वी असांजच्या वकिलांची बाजू ऐकून घेणार आहेत. त्यानंतरच असांजेच्या प्रत्यार्पणाचा निर्णय घेतला जाणार आहे. असांजेच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिका गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहे.

ज्युलियन असांजे हे मूळचे ऑस्ट्रेलियन नागरिक आहेत. अमेरिकेत गुप्त सरकारी दस्तऐवज सार्वजनिक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यांनी ही कागदपत्रे त्यांच्या 'विकीलीक्स' पोर्टलवर सार्वजनिक केली. यानंतर केवळ अमेरिकेतच नाही तर जगभरात मोठा गदारोळ झाला होता. विशेष म्हणजे, अफगाणिस्तान-इराक युद्धादरम्यान लष्करी कारवाईशी संबंधित 50 हजार गुप्त फाईल्स सार्वजनिक केल्याबद्दल अमेरिकेला ज्युलियन असांजेवर खटला चालवायचा आहे.

2012 ते 2019 पर्यंत लंडनमध्ये इक्वेडोरचा आश्रय

असांजेवर 2011-12 मध्ये स्वीडिश महिलेने बलात्काराचा आरोपही केला होता. या आरोपांनंतर असांजे यांनी इक्वेडोरकडे आश्रय मागितला होता. त्यास सरकारची संमती मिळाल्यानंतर एप्रिल-2019 पर्यंत लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासाच्या एका छोट्या खोलीत असांजेंनी आश्रय घेतला होता. त्यानंतर जेव्हा इक्वेडोर सरकारने दिलेला आश्रय मागे घेतला तेव्हा असांजेला यूके पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून असांजे तुरुंगातच आहे. तुरुंगात असतानाच असांजेने महिनाभरापूर्वीच त्याची गर्लफ्रेंड स्टेला मॉरिसशी लग्नही केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT