US Plane Crash in Japan Esakal
ग्लोबल

US Plane Crash in Japan: 8 प्रवाशी असणाऱ्या अमेरिकेच्या लष्करी एअरक्राफ्टचा जपानमध्ये अपघात; एका प्रवाशाच्या मृत्यू

अमेरिकेच्या लष्करी एअरक्राफ्टचा जपानच्या याकुशिमा बेटाजवळ अपघात झाला आहे. माहितीनुसार, एअरक्राफ्टमध्ये ८ प्रवासी होते. त्यातील किमान एका प्रवाशाच्या मृत्यू झाल्याची माहिती आहे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- अमेरिकेच्या लष्करी एअरक्राफ्टचा जपानच्या याकुशिमा बेटाजवळ अपघात झाला आहे. माहितीनुसार, एअरक्राफ्टमध्ये ८ प्रवासी होते. त्यातील किमान एका प्रवाशाच्या मृत्यू झाल्याची माहिती आहे. इतर सात प्रवाशांबाबत माहिती मिळू शकलेली नाही. तसेच अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अमेरिकेचे CV-22 Osprey एअरक्राफ्ट याकुशिमा विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी त्याच्या डाव्या बाजूच्या इंजिनमध्ये आग लागली होती. बीबीसी न्यूजने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (A US military aircraft with eight personnel on board has crashed off Yakushima Island in Japan)

एअरक्राफ्ट इवाकून बेसवरुन याकुशिमा प्रांतातील ओकीनावाच्या काडेना बेसकडे निघाले होते. जपानच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एअरक्राफ्ट स्थानिक वेळ १४:४० वाजता रडावर दिसेनासे झाले होते. त्यानंतर सात मिनिटांनी कोस्ट गार्डंना एमरजेन्सी कॉल आला. त्यात एअरक्राफ्टचा अपघात झाल्याची सूचना देण्यात आली.

सहा बोट आणि दोन हेलिकॉप्टर घटनास्थळी पाठवण्यात आले. दोन चोपर्स स्थानिक वेळ १६:०० वाजता घटनास्थळी पोहोचले होते. CV-22 Osprey एअरक्राफ्ट हेलिकॉप्टर आणि टर्बोप्रोप एअरक्राफ्ट अशा दोन्ही प्रकारचे कार्य करु शकते. स्थानिक माध्यमांनुसार, विमानाचे काही अवशेष याकुशिमा येथे आढळले आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ही' नक्कल केल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा विजय झाला; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमारांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोट्यावधी रुपयांचं चरस जप्त

MLA Hemant Rasne : कसबा विधानसभा नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने करणार कचरा कोंडीमुक्त मतदारसंघासाठी प्रयत्न

Islampur Results : जयंतराव-निशिकांत पाटलांमध्ये गावागावांत टक्कर; अनेक गावांत जयंतरावांना धक्‍का, कोणाला किती पडली मतं?

Crime News: स्मशानातील लाकडांवर रक्ताचे डाग; दोघांनी मिळून केला होता खून, पोलिसांनी 'असा' लावला छडा

SCROLL FOR NEXT