काबुल - अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू नजीबुल्लाह तारकाई याला कारने धडक दिली असून या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. नजीबुल्लाह तारकाई पूर्व नंगरहारमध्ये रस्ता पार करत होता. त्यावेळी एका कारने त्याला जोरात धडक दिली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नझीम जर अब्दुलरहीमजई यांनी सांगितलं की, 29 वर्षी क्रिकेटपटू आयसीयुमध्ये आहे. त्याची प्रकृती स्थिर असली तरी अपघात झाल्यापासून अद्याप शुद्धीत आलेला नाही.
याबाबत डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, नजीबुल्लाह गंभीर जखमी झाला असून त्याच्या प्रकृतीबाबत आताच काही सांगता येणार नाही. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नजीबुल्लाह सध्या कोमात आहे. त्याच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नजीबुल्लाह तारकाईला जलालाबाद शहरातील नंगरहारमध्ये एका कारने धडक दिली होती.
तारकाईने 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. आतापर्यंत त्याने 12 टी 20 आणि एक एकदिवसीय सामना खेळला आहे. टी20 मध्ये त्याने चार अर्धशतकांसह 258 धावा केल्या आहेत. तर 24 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याने 2030 धावा केल्या असून यामध्ये सहा शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. नुकतंच त्यानं शापागीजा क्रिकेट लीगमध्ये मीस आयनक नाइटसचं प्रतिनिधित्व केलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.