Taliban Punishment Esakal
ग्लोबल

Taliban: "तर दगडाने ठेचून मारणार..." तालिबानी शिक्षांमुळे अफगाणी महिलांचे जगणे मुश्कील

Afgan Women: अधिक लोकाभिमुख सरकारचे आश्वासन देऊनही, तालिबानने पुन्हा एकदा सार्वजनिक फाशी आणि फटके मारण्यासारख्या कठोर शिक्षा पुन्हा सुरू केल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Taliban Punishment For Adultery:

तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा याचा एक ऑडिओ मेसेज नुकताच व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो व्याभिचार करणाऱ्या अफगाण महिलांना चाबकाचे फटके आणि दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा देणार असल्याचे म्हणत आहे.

तालिबानच्या या नेत्याने यावेळी त्यांचा पाश्चात्य लोकशाहीविरुद्ध लढा सुरूच राहील असेही जाहीर केले.

आपल्या ऑडिओ मेसेजमध्ये मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा पाश्चात्य अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाला की, "जेव्हा आम्ही त्यांना दगडाने ठेचून मारू, तेव्हा तुम्ही याला महिलांच्या हक्कांचे उल्लंघन म्हणाल."

“पण आम्ही लवकरच व्यभिचाराच्या शिक्षेची अंमलबजावणी करू. आम्ही महिलांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी सार्वजनिक ठिकाणी चाबकाचे फटके मारू. आम्ही त्यांना सार्वजनिक ठिकाणी दगडाने ठेचून ठार मारू,” असे अखुंदजादा पुढे आपल्या मेसेजमध्ये म्हणाताना ऐकू येत आहे.

अफगाणिस्तानचा सरकारी टीव्ही, आता तालिबानच्या नियंत्रणाखाली आहे. याद्वारे अखुंदजादा याचे व्हॉइस मेसेजेस प्रसारित केले जातात.

तालिबानने अफगाणिस्तानवर सत्ता मिळवल्यापासून काही जुने फोट सोडले तर अखुंदजादाला कोणीही सार्वजनिकरित्या पाहिलेले नाही. तो तालिबानचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण कंदाहारमध्ये असल्याची माहिती सतत समोर येत असते.

अधिक लोकाभिमुख सरकारचे आश्वासन देऊनही, तालिबानने पुन्हा एकदा क्रूर सार्वजनिक फाशी आणि फटके मारण्यासारख्या कठोर शिक्षा पुन्हा सुरू केल्या आहेत.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांनी तालिबानवर जोरदार टीका करत देशाच्या राज्यकर्त्यांना अशा पद्धती थांबवण्याचे आवाहन केले आहे.

आपल्या ऑडिओ मेसेजमध्ये अखुंदजादा म्हणाला की, आंतरराष्ट्रीय समुदाय ज्या महिलांच्या हक्कांसाठी वकिली करत आहे ते तालिबानच्या इस्लामिक शरियाच्या कठोर व्याख्याच्या विरोधात आहे.

अखुंदजादाच्या या वक्तव्यामुळे अफगाणिस्तानमध्ये मध्ये संताप निर्माण झाला आहे. हे प्रकार रोकण्यासाठी काहींनी आंतरराष्ट्रीय समुदायाला तालिबानवर दबाव वाढवण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शेअर बाजार तुफान वाढणार; महाराष्ट्रात भाजपच्या विजयाचा होणार परिणाम, एक्स्पर्टने सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates : हेमंत रासने यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

Maharasthra Vidansaha Election: ईव्हीएम गडबड नाही, निवडणुक आयोगाने फेटाळला आरोप

IND vs AUS 1st Test: अरे, आधी अम्पायरकडे बघ! Mohammed Siraj सेलिब्रेशन करत पळत सुटला, मग पुढे जे घडलं ते...; ड्रेसिंग रुममध्ये रोहितही दिसला

SCROLL FOR NEXT