ग्लोबल

अमेरिकेत जन्मलेले जलाली होणार अफगाणिस्तानचे राष्ट्रपती

सकाळ डिजिटल टीम

अफगाणिस्तानमध्ये हंगामी सरकार स्थापन होणार आहे. या सरकारमध्ये सर्व सूत्रे अली अहमद जलालीकडे असणार आहेत.

काबुल - अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला असून राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडला आहे. तालिबानने काबुल ताब्यात घेतल्यानंतर सत्ता हस्तांतरणाच्या हालचाली सुरु झाल्या. आता अफगाणिस्तानमध्ये हंगामी सरकार स्थापन होणार आहे. या सरकारमध्ये सर्व सूत्रे अली अहमद जलालीकडे असणार आहेत. अफगाणिस्तानमध्ये अली अहमद जलाली हे तितके प्रभावी किंवा मोठे नेते नाहीत. मात्र राजकारण आणि त्यातल्या डावपेचांमध्ये ते माहीर आहेत. अनेक वेळा त्यांनी देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे. एक राजदूत ते प्राध्यापक आणि कर्नल ते सरकारमध्ये मंत्री अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आहेत. अफगाणिस्तानचं राजकारण त्यांनी जवळून पाहिलं आहे आणि तालिबानमध्ये त्यांचा प्रभाव आहे.

अली अहमद जलाली यांचा जन्म अफगाणिस्तानात नाही तर अमेरिकेत झाला होता. 1987 पासून ते अमेरिकेचे नागरिक होते. 2003 मध्ये अफगाणिस्तानात अली अहमद जलाली जेव्हा परतले तेव्हा तालिबानचे अफगाणिस्तानमधील वर्चस्व कमी होत होते. देशाला त्यावेळी खंबीर अशा सरकारची आवश्यकता होती. कठीण अशा काळात जलाली यांना देशाचे इंटिरियर मिनिस्टर करण्यात आले होते. सप्टेंबर 2005 पर्यंत ते या पदावर होते. याशिवाय जेव्हा अफगाणिस्तानात 80 च्या दशकात सोविएत संघासोबत मोठं युद्ध झालं होतं. तेव्हा अली अहमद जलाली यांनी मोठी भूमिका बजावली होती. त्यावेळी जलाली हे अफगाण लष्करात कर्नल पदावर होते. त्यावेळी अफगाणिस्तानच्या Resistance Headquarters साठी ते वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करत होते. त्यांनी प्रत्येक कठीण काळात अफगाणिस्तानसाठी काम केलं आहे.

तालिबानची वाढती ताकद आणि जलाली यांच्याकडे सूत्रे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यात आता जलाली सत्तेत आल्यास अफगाणिस्तानसाठी चांगलं की वाईट याची चर्चाही होत आहे. नव्या हंगामी सरकारमध्ये तालिबान गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करू शकते. मात्र अफगाणिस्तानकडे आता जलाली यांच्यावर विश्वास ठेवणं एवढाच पर्याय आहे. तसंच त्यांच्या आधीच्या कामामुळे सकारात्मक अशा अपेक्षाही व्यक्त केल्या जात आहेत.

जलाली यांनी देशाचे इंटिरिअर मंत्री असताना अफगाण नॅशनल पोलिसांची एक फौज उभारली होती. त्यात 50 हजार जवानांना ट्रेनिंग देण्यात आलं होतं. तसंच सीमा पोलिसांसाठी 12 हजार अतिरिक्त सैनिक तयार करण्यात आले होते. दहशतवाद्यांपासून ते घुसखोरीपर्यंत त्यांनी अनेकदा कठोर अशी भूमिका घेतली होती. 2004 मध्ये राष्ट्रपती निवडणूक घेण्यात आणि 2005 मध्ये संसदीय निवडणुकीत जलाली यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे हंगामी सरकारची सूत्रे स्वीकारताना त्यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे. दहशतीच्या सावटाखाली भयग्रस्त झालेल्या अफगाणिस्तानची परिस्थिती ते कशी हाताळतात ते पहावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT