afghanistan earthquake death toll  
ग्लोबल

Afghanistan Earthquake : भय इथले संपेना! भूकंपाने अफगाणिस्तान पुन्हा हादरलं; रिश्टर स्केलवर 6.1 तिव्रता

रोहित कणसे

Afghanistan Earthquake : काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तान झालेल्या भूकंपात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोक बेघर झाले आहेत. मात्र अफगाणिस्तान येथील भय मात्र अजूनही संपलेलं नाहीये. या विनाशकारी भूकंपानंतर आज सकाळी 06:11 वाजता पुन्हा अफगाणिस्तानला भूकंपाचे हादरे बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी असून नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने याबद्दलची माहिती दिली आहे.

शनिवारी दुपारी आलेल्या भूकंपाने अफगाणिस्तानात मोठं नुकसान केलं आहे. तालिबानकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार. पश्चिम अफगाणिस्तानात आलेल्या या भूकंपात चार हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 9 हजार लोक जखमी झाले आहेत, यासोबतच 1,300 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे.

अफगाणिस्तानात आलेले हे विनाशकारी भूकंप गेल्या दोन दशकांत अफगाणिस्तानमध्ये आलेला सर्वात प्राणघातक भूकंप ठरला आहे, ज्यामुळे देशासमोरील आव्हाने आणखी वाढली आहेत. दरम्यान या भूकंपानंतर चीनने रविवरी अफगान रेड क्रिसेंट यांना मदतकर्यासाठी 2000,000 अमेरिकन डॉलर इतकी भरघोस मदत केली आहे.

यापूर्वी आपत्ती प्राधिकरणाचे प्रवक्ते मोहम्मद अब्दुल्ला जान यांनी सांगितले होते की, हेरात प्रांतातील झेंडा जान जिल्ह्यातली चार गावांना भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र हेरात शहरापासून 40 किलोमीटर उत्तर पश्चिमेस होतं. यानंतर तीन मोठे हादरे बसले, ज्यांची तीव्रता 6.3,5.9 आणि 5.5 इतकी नोंदवली हेली. यासोबत कमी तिव्रतेचे धक्के देखील बसले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT