ग्लोबल

तालिबानने गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या, पाकिस्तानकडून समर्थन

नामदेव कुंभार

अफगाणिस्तान सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर, इम्रान खान यांचं तालिबान्यांना समर्थन

तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर ताबा मिळवल्याने मध्य पूर्व आशियातील राजकीय, आर्थिक आणि सामरिक गणिते पूर्णतः बदलली आहेत. पुन्हा एकदा तालिबानची सत्ता आल्यामुळे अफगाणिस्तानमधील नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण आहे. विमानतळावर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आहे. असं असताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी तालिबानी सत्तेचं स्वागत केलं आहे. ‘‘ सांस्कृतिक गुलामगिरीच्या बेड्या झुगारून लावणे कठीण असते, आता अफगाणिस्तानमध्ये तेच घडते आहे. तालिबानने गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या आहेत.’’ असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी मांडले.

अफगाणिस्तानची सगळी सूत्रे तालिबानने हाती घेताच इमरान यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली ही प्रतिक्रिया अधिक सूचक मानली जाते. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा मोहंमद कुरेशी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की ‘‘ राजकीय आघाडीवर तोडगा काढण्यासाठी आम्ही अफगाणिस्तानसोबत चर्चा करायला तयार आहोत. यासाठी जागतिक समुदायाने देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे.’’ दुसरीकडे अन्य देशांमध्ये तालिबानला मदत केल्याबद्दल पाकिस्तानविरोधात शेकडो लोकांनी आंदोलन केल्याचे चित्र पाहायला मिळाले. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रियामध्येही याचे पडसाद उमटले.

भारताची भूमिका

‘‘ सर्वप्रकारच्या दहशतवादाला विरोध असेल तर अफगाणिस्तानची भूमी ही एखाद्या दहशतवादी संघटनेकडून अन्य देशांवर हल्ला करण्यासाठी किंवा त्याला धमकावण्यासाठी वापरली जाता कामा नये. तरच शेजारी देशांना अधिक सुरक्षित वाटू शकेल.’’ असे स्पष्ट मत संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी मांडले. आज भारताच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना तिरुमूर्ती यांनी उपरोक्त भाष्य केले. काबूलमधील विमानतळावर आज दुर्दैवी चित्र पाहायला मिळाले. लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. महिला आणि मुले तणावाखाली होती. विमानतळासह शहरामध्येही गोळीबाराच्या घटना घडल्याचे समजते, असे तिरुमूर्ती यांनी नमूद केले. एक शेजारी आणि मित्र या नात्याने अफगाणिस्तानातील स्थिती पाहून आम्हाला चिंता वाटते. त्या देशातील महिला आणि मुले कायम भीतीच्या वातावरणात आहेत. त्यांना आज त्यांच्या भवितव्याची चिंता वाटते आहे असेही ते म्हणाले. अफगाणिस्तानातील ३४ विविध प्रांतांमध्ये भारताच्या पुढाकाराने विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. सर्वच घटकांनी कायदा सुव्यवस्था कायम राहील याकडे लक्ष द्यावे. सर्वांची सुखरूप सुटका होणे गरजेचे आहे, असेही तिरुमूर्ती यांनी सांगितले.

तालिबानशी मैत्रीला चीन तयार

अफगणिस्तानची सत्ता तालिबान्यांच्या हाती जाताच चीनने आपला सूर बदलला आहे. या देशासोबत मैत्रीपूर्ण सहकार्याचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी आम्ही तयार आहोत असे चीन सरकारच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. चीनने अफगाणिस्तानातील त्यांचा दूतावास सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असून अमेरिका आणि रशियानेदेखील तोच कित्ता गिरवला आहे. अमेरिकेच्या माघारीनंतर चीन सरकार तालिबान्यांशी अनौपचारिक संबंध प्रस्थापित करण्यास उत्सुक असल्याचे दिसून आले आहे. चीनची अफगाणिस्तानला देखील सीमा लागून असून तिची लांबी तब्बल ७६ किलोमीटर एवढी आहे. शिनजियांग प्रांतातील उघूर मुस्लिमांना आता तालिबानी आश्रय देऊ शकतात, अशी भीती चीन सरकारला आहे. मागील महिन्यात तालिबान्यांचे एक शिष्टमंडळ चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांना भेटले होते. यावेळी या शिष्टमंडळाने आमचा देश दहशतवाद्यांसाठीचा तळ होणार नाही, असे आश्‍वासन दिले होते. या बदल्यात चीन अफगाणिस्तानला आर्थिक उभारणीसाठी मदत करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT